BGMI मोबाईल गेम बनवणारी कंपनी क्राफ्टॉन भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. देशातील गेमिंग इंडस्ट्रीची ग्रोथ पाहून कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतामध्ये गेम डेव्हलपमेंट स्टार्टअपच्या वाढीसाठी गेमिंग इनक्युबेटर लाँच केलं आहे.
'क्राफ्टॉन इंडिया गेमिंग इनक्युबेटर' (KGMI) अशा नावाने कंपनीने एक नवीन प्रोग्राम सुरू केला आहे. या माध्यमातून वर्षाला सुमारे 10 गेमिंग टीम्सना मदत करण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
गेमिंग क्षेत्रातील टीम्सना या क्षेत्राबद्दल माहिती देणे, गेम डेव्हलपमेंटसाठी मदत करणे, फंडिंग गोळा करण्यासाठी मदत करणे, तसेच गरज भासल्यास निधी पुरवणे अशा गोष्टींसाठी क्राफ्टॉन मदत करणार आहे. विद्यार्थी, स्टार्टअप टीम्स, स्वतंत्र डेव्हलपर्स असे सर्व जण KGMI प्रोग्रामसाठी पात्र असतील.
"भारतात गेमिंग कंटेंटची मागणी वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा अगदीच कमी आहे. देशात कित्येक स्टार्टअप्स आणि स्मॉल, मीडियम, लार्ज साईज गेम डेव्हलपर्स आहेत. मात्र, गेमिंग इंडस्ट्रीच्या वाढीसाठी जी परिसंस्था आवश्यक आहे, ती भारतात नाही"; असं मत क्राफ्टॉन इंडियाचे सीईओ शीन ह्युनिल सोहन यांनी म्हटलं आहे.
भारतात सोनी, एपिक गेम्स या कंपन्यांचे देखील अशा प्रकारचे इन्क्युबेशन प्रोग्राम उपलब्ध आहेत. मात्र, त्यामध्ये कित्येक प्रकारच्या नियम आणि अटी आहेत. हे प्रोग्राम ठराविक गेमिंग इंजिन किंवा प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध आहेत.
क्राफ्टॉन मात्र अशा प्रकारची कोणतीही अट ठेवणार नाही. केवळ मोबाईलच नाही, तर पीसी गेमिंगसाठी देखील क्राफ्टॉन मदत करेल, असंही सीईओंनी सांगितलं. अर्थात गॅम्बलिंग, बेटिंग किंवा कोणत्याही प्रकारच्या 'रिअल मनी गेमिंग'ला क्राफ्टॉन सहकार्य करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.