Bike Care Tips  esakal
विज्ञान-तंत्र

Bike Care Tips : बाईकचे मायलेज वाढवण्याच्या सोप्या टिप्स, रिझल्ट पहायचा असेल तर नक्की ट्राय करा

तुम्ही स्वत:च काळजी घेऊन बाईकला सुसाट करू शकता, कसं ते वाचा

Pooja Karande-Kadam

Bike Care Tips : आता पेट्रोलच्या किंमतीनी जाळच काढला आहे. पेट्रोलच्या किंमतींनी प्रति लीटर ११० रुपयांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे हल्ली लोकांचा इंधनावरील खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेक लोक वाहन खरेदी करताना त्या वाहनाच्या मायलेजचा विचार करु लागले आहेत.

पण, आता हातात असलेली बाइक किंवा स्कूटर जास्तीत जास्त मायलेज कशी देईल याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. बाईक नवी असताना ती सतत धुणे, हळू चालवणे, खड्डा चुकवत चालवणे यासारख्या पद्धतीने तिची काळजी घेतली जाते. यामुळे तिच इंजिन चांगलं काम करतं. पण आपणच केलेल्या हलगर्जीपणामुळं गाडी लगेचच धोका देऊ लागते.

आता हेच बघा ना, एखादी बाईक घेतल्यानंतर एक ते दोन वर्ष ती मायलेज चांगलं देते. पण, काही दिवसातच ती कमी मायलेज द्यायला लागते. वारंवार गॅरेजमध्ये दाखवूनही ती म्हणावे तसे मायलेज देत नाही. कोणत्यागी गॅरेजमध्ये न नेता गाडीचं मायलेज वाढवण्यासाठी नेमकं काय करायचं याच्या काही टिप्स आपण पाहुयात.

सर्व्हिसिंग

तुम्ही तुमच्या बाइकची नियमित सर्व्हिसिंग करत आहात मात्र तरीदेखील मायलेज चांगलं मिळत नाही. अशा वेळी कार्ब्युरेटरची (Carburetor) सेटिंग बदलण्याची गरज असते. कार्ब्युरेटरची सेटिंग इलेक्ट्रिक आणि मॅन्युअली दोन्ही बदलण्याची गरज असते. त्याच्या मदतीने बाइकचे मायलेज सुधारण्यास मदत होते. मायलेज सुधारण्यासाठी तुम्ही कार्ब्युरेटर जेटचादेखील वापर करु शकता. कार्ब्युरेटर जेट म्हणजे वाहनाच्या फ्यूल इंजेक्ट सिस्टिममधला एक बदल आहे.

टायरमधील प्रेशर

टायर्स हे तुमच्या आणि रस्त्यामधील दुवा आहेत.याचा थोडा जरी इनबॅलन्स झाला तरी मोठा अपघात होऊ शकतो.  त्यामुळे टायर्सची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. टायरची काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं तर, टायरमधील हवा वेळोवेळी तपासली पाहिजे.

हवेचा दाब योग्य असेल तर तुम्हाला योग्य मायलेज मिळू शकते. कधी कधी टायर इतके झिजलेले असतात तरीही तसेच वापरले जातात. पण,वेळ पडल्यास ते बदलणं गरजेचं आहे.

गाडीचे स्पीड

काही लोकांना खड्डे असलेल्या रस्त्यावरही गाडी पळवायची सवय असते. त्यामुळे बाईकचे मायलेज कमी होते. एखाद्या ग्रँड प्रिक्स रेसरप्रमाणे बाईक चालवण्याची सवय असेल, तर ही सवय वेळीच बदला. त्यामुळे इंजिनही खराब होऊ शकते.

बाईकचे वेळोवेळी सर्व्हिसिंग करावे

क्लच, ब्रेक आणि पेडल

अनेकांना क्लच आणि ब्रेक लिव्हरवर एक किंवा दोन बोटं ठेवून गाडी चालवण्याची सवय असते. काही जण मागील ब्रेक पेडलवर उजवा पाय ठेवत बाईक चालवतात. यामुळे रिअॅक्शन टाइम कमी होतो. अशा प्रकारे पाय ठेऊन बाईक चालवणे ही वाईट गोष्ट नाही. पण असे करत असताना, काही जण गरज नसताना क्लच आणि ब्रेक ऑपरेट करतात. क्लच गरज नसताना वापरू नये. यामुळे गाडी मायलेज चांगले देईल.

ऑईल बदली

एखाद्या व्यक्तीला सुरळीत काम करण्यासाठी अन्न, पाण्याची गरज असते. अगदी तसंच गाडीलाही वेळोवेळी ऑईल बदलीची गरज असते. बाईकची चैन, इंजिनमध्ये ऑईन नीट ठेवल्याने ती चांगले मायलेज देते.

ट्राफिक रूल

तुम्हाला माहितीय का की, ट्राफिक रूल पाळल्यानेही मायलेज चांगलं मिळते. ते कसं तर, ,तुम्ही ग्रूपने फिरताना दोन, चार मित्रांना एकाच बाईकवर घेऊन फिरत असाल. तर, त्यामुळे गाडी पळणारत नाही. याचा थेट परिणाम मायलेजवर होतो. असे चारजण फिरताना पकडला गेलात. तर, पावती कापली जाईल हा वेगळाच भुर्दंड बसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT