Bike Riding Tips esakal
विज्ञान-तंत्र

Bike Riding Tips : नव्याने बाईक चालवायला शिकलात? या गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...

तूम्हीही नव्यानेच बाईक हातात घेतलीय का? मग हे वाचाच

Pooja Karande-Kadam

Beginner's Riding Tips : पाय फिरवून गाडीवर बसायचं, स्टाईलमध्ये चावी लावायची अन् स्टार्टर असूनही जोरात किक मारायची अन् करंट अंगात गेल्यावानी सुस्साट जायचं, हे आजच्या बाईक चालवणाऱ्यांच वर्णन होतं. कारण,बाईक चालवायची म्हटली की अंगात वारं शिरल्यावानी तरूण पोरं सुस्साट सुटतात आणि मग नंतर अडचणीत येतात.

बाईकमुळे आपल्या कामांना वेग आला आहे. असे असेल तरीही ती चालविताना काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसागणिक बाईकचे अपघात आणि त्यामध्ये जखमी किंवा मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत होणारी वाढ आपण पाहत असतो. मात्र योग्य ती काळजी घेतल्यास बाईक रायडिंग आनंद तर देईलच पण ते सुरक्षितही राहील..

नवनवीन रायडर्सची संख्या झपाट्याने वाढत आहेच. पण त्यासोबतच बाईकवरून अनावश्यक स्टंटबाजी करणाऱ्या, वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामूळेच आम्ही नवीन रायडर्सनी लक्षात घेतल्या पाहिजेत अशा काही गोष्टी पाहुयात.

बाईक नव्याने हातात घेतलेल्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण, नवे असल्यामूळे नव्या बाईकर्सना काही गोष्टींची माहिती नसते. त्यामूळे ते अडचणीत येऊ शकतात. अशावेळी नव्यानेच बाईकला आपलसं केलेल्यांसाठी काही टिप्स पाहुयात.

वाहतूक नियम पाठच करा

नवी गाडी घेतली, तिचे लायसन्सही मिळाले म्हणजे तूम्हाला परफेक्ट गाडी चालवता येते असे नाही. एक परफेक्ट बाईक रायडर होण्यासाठी आधी तूम्ही वाहतुकीचे नियम जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने तूम्हाला आर्थिक दंड तर सोसावा लागतोच. त्याचसोबत अपघाताला आमंत्रणही मिळते. त्यामूळेच वाहतुकीचे नियम तोंडपाठ करून ठेवा.

नव्या बाईकर्ससाठी टिप्स

सुरक्षित अंतर ठेवा

गाडी चालवण्यात तूम्ही नवे असाल तर इतर गाड्यांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याची सवय लावून घ्या. कारण, काहीवेळा चार चाकी चालवणारे लोक मागे न पाहताच टर्न घेतात. त्यामूळे तूमच्या गाडीचा अपघात होऊ शकतो. गाडीचे नुकसानही होऊ शकते.

साईड मिरर वापरा

बाईक तूम्ही सुरक्षितरित्या चालवत असाल तरी समोरील व्यक्ती तूम्हाला येऊन धडकला तर काय करायचं. त्यामूळेत सुरक्षेसाठी बाईकचा मिरर नेहमी वापरा. गाडी चालवताना त्याकडे लक्ष द्या. तूम्ही हायवेला असाल वा शहरातील ट्राफिक जाममध्ये ओव्हरटेक करताना तुम्हाला आरशात आजूबाजूची वाहने दिसयला हवीत. हे लक्षात ठेवा. काहीवेळा अंधारात दिसत नाही त्यामूळे आजूबाजूला पाहतच गाडी पळवा.

साईड मिररचा वापर करा

स्वत:ची काळजी घ्या

जेव्हा तुम्ही बाईक चालवत असाल तर गियरची पुर्ण माहिती घ्या. तुमच्या सुरक्षेसाठी, तुम्ही नेहमी सुरक्षित राहता याची खात्री करण्यासाठी प्रोटेक्शन पॅड, हाय-एंड हेल्मेट आणि पायांच्या सुरक्षेसाठी राइडिंग बूट वापरा.

बाईकला बनवा अधिक सुरक्षित

तूम्हाला नोकरीनिमित्त रात्रीच्यावेळी प्रवास करावा लागत असेल. तर, तूम्ही अधिक काळजी घ्यायला हवी. कारण,रात्रीच्यावेळी अवजड वाहनांची वर्दळ जास्त असते. त्यामूळे तूम्ही बाईलका डीआरएल सोबत योग्य लाइटिंग आणि रिफ्लेक्टिव टेपही लावा. ज्यामूळे मोठ्या ट्रकच्या ड्रायव्हर्सना तूमची बाईक दिसेल. आणि तूम्ही सुरक्षित रहाल.

गाडीची काळजी आहे म्हणूनतरी गाडी हळू पळवा

वेगावर नियंत्रण

आपण चालवत असलेल्या बाईकच्या वेगाबाबत एक मर्यादा ठरलेली असते. त्यानुसार बाईक चालवायला हवी. आपल्या गाडीच्या मर्यादेपलिकडे जाणे टाळावे. गाडी शांतपणे चालवावी. विनाकारण वेगाने चालविणे टाळावे.

बाईकची काळजी घ्या

तूम्ही चालवत असलेली बाईक नवी असली तरी तिचे वेळोवेळी सर्व्हीसिंग झाले आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. गाडीचे ब्रेक, हॉर्न योग्यपद्धतीने चालत नसतील तरीही अनेकजण तशीच गाडी वापरत राहतात. मात्र हे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे गाडीचे वेळच्यावेळी सर्व्हीसिंग करणे आवश्यक आहे.

वाहतुकीचे नियम पाठच करून ठेवा

पेट्रोल चेक करा

अनेकदा बाईकमधील पेट्रोल संपते. त्यामूळे नाहक त्रास सहन करावा लागतो. गाडी नव्याने चालवत असलेल्या लोकांना नेहमीच या गोष्टीचा सामना करावा लागतो. कारण, बाईकर्सना गाडी किती मायलेजचा अंदाज नसतो. त्यामूळे गाडी हातात घेतल्यावर किंवा लाँग ड्राईव्हला जाताना पेट्रोल किती आहे याचा अंदाज घ्या.

गाडीची स्वच्छता

गाडी हातात घेतल्यानंतर तूम्ही किक मारून काहीच क्षणात इतरांच्या अंगावर धूळ उडवत जाता. त्यामूळे इतर लोकांवर धूळ उडतेच. पण, जास्त तूमची गाडी घाण होते. चिखलात, पाण्यात गाडी पळवताना ती जास्त बरबटते. त्यामूळे गाडी वेळच्यावेळी वॉश करा. कारण धूळ साचत गेल्याने गाडीचा रंग डॅमेज होण्याची शक्यता असते.

बाईक राईडचं वेड असूद्या पण सांभाळून ड्रायव्हिंग करा

ट्राफिक जाममध्ये अडकल्यानंतर

ट्राफिक जाममध्ये अडकल्यानंतर वाट शोधत वेडीवाकडे वळणे घेत मार्ग शोधू नये. त्यामूळे पुढे जाऊन आणखी गर्दीत अडकण्याची शक्यता असते. तसेच, वाट काढताना गाडीचा अपघात होणार नाही ना,याची काळजी घ्या.

गाडीचा विमा उतरवा

तूमच्या बाईकचा विमा उतरवून घ्या. तूम्ही नव्यावेच गाडी हातात घेतली असेल तर या गोष्टीची तूम्हाला जास्त गरज असते. तूमच्यासाठी गाडी चालवण्याचा नवा अनूभव असतो त्या काळात गाडीला अपघात होण्याची जास्त शक्यता असते. त्यामूळे स्वत:चा आणि बाईकचा विमा उतरवून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT