Bill Gates on Work-Life Balance : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआयमुळे भविष्यात कित्येक जणांच्या नोकऱ्या जाणार असल्याची भीती सगळीकडून व्यक्त करण्यात येते. यातच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. एआयमुळे लोकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत. उलट, यामुळे आठवड्यातील कामाचे दिवस कमी होतील; असं मत गेट्स यांनी व्यक्त केलं.
बिल गेट्स हे प्रसिद्ध कॉमेडियन ट्रेव्हर नोव्हा याच्या 'व्हाट नाऊ?' या पॉडकास्टला उपस्थित होते. यावेळी त्यांना एआय आणि त्याच्या धोक्यांबाबत विचारण्यात आलं. यावर बिल गेट्स म्हणाले, की भविष्यात एआयमुळे असं जग निर्माण होऊ शकतं ज्यामध्ये माणसांना जास्त मेहनत करावी लागणार नाही. कारण, दैनंदिन कामांची जबाबदारी मशीन्सवर असेल.
भविष्यात जेवण बनवण्यापासून कित्येक दैनंदिन कामं करण्यासाठी एआय-आधारित मशीन तयार होऊ शकतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे आठवड्यातील कामाचे दिवस देखील कमी होऊन तीन होऊ शकतात. यामुळे वर्क-लाईफ बॅलन्स आणखी चांगला होऊ शकतो; असंही बिल गेट्स म्हणाले.
बिल गेट्स यावेळी म्हणाले, की आयुष्यातील दोन दशकांहून अधिक काळ आपण केवळ कंपनी उभारण्यावर काम करत होतो. आता वयाच्या 68व्या वर्षी मला असं जाणवतंय की आयुष्याचा उद्देश केवळ नोकरी करणं नाही. (Tech News)
एआयच्या धोक्यांबाबत बोलत असताना गेट्स यांनी फेक न्यूज, डीपफेक, जॉब मार्केटमधील बदल आणि शिक्षणावर होत असलेला परिणाम या गोष्टींचा उल्लेख केला. नवीन तंत्रज्ञानामुळे जॉब मार्केटमध्ये बदल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. "एआयचा प्रभाव हा औद्योगिक क्रांतीएवढा मोठा नसेल, मात्र पर्सनल कॉम्प्युटरच्या सुरूवातीमुळे जेवढा प्रभाव पडला तेवढा नक्कीच असेल" असं ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी युवकांनी आठवड्याचे 70 तास काम करावं असं मत व्यक्त केलं होतं. यातच आता बिल गेट्स यांनी वर्क-लाईफ बॅलन्सबाबत थोडं वेगळं वक्तव्य केल्यामुळे याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.