X block feature : इलॉन मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) ने ब्लॉक फिचरमध्ये एक मोठा बदल केला आहे. यापूर्वी जेव्हा एखाद्या वापरकर्त्याला ब्लॉक केले जात असे, तेव्हा त्या वापरकर्त्याला ब्लॉक करणाऱ्या व्यक्तीचे प्रोफाइल, पोस्ट्स, फॉलोअर्स आणि फॉलोइंग लिस्ट पाहता येत नव्हते. परंतु आता या फिचरमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे ब्लॉक केलेले वापरकर्ते ब्लॉक करणाऱ्या व्यक्तीची प्रोफाइल आणि पोस्ट्स पाहू शकतील.
या नव्या फीचरनुसार, जरी ब्लॉक केलेल्या व्यक्तीला प्रोफाइल आणि पोस्ट्स पाहण्याची मुभा मिळाली असली, तरी त्यांना त्या पोस्टवर उत्तर देणे, रीट्विट करणे किंवा लाईक करणे शक्य होणार नाही. तसेच, ते अद्याप थेट संदेश (DM) पाठवू शकणार नाहीत.या बदलामुळे X वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वापरकर्त्यांना या बदलामुळे त्यांची वैयक्तिक माहिती आणि सुरक्षिततेवर धोका निर्माण होईल अशी भीती वाटत आहे. ब्लॉक फिचरचा वापर अनेक वापरकर्त्यांनी स्वतःची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी केला होता.
मात्र, आता हा बदल आणल्यामुळे वापरकर्त्यांना अधिक पारदर्शकता मिळेल, असे X ने स्पष्ट केले आहे. इंजिनिअरिंग टीमच्या मते, “ब्लॉक फिचरचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या संभाव्य गैरवर्तनाचा अंदाज येईल आणि हे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरेल.”
दुसरीकडे, मेटा (Meta) इंस्टाग्रामवर खोटं वय सांगणाऱ्या किशोरवयीन वापरकर्त्यांना ओळखण्यासाठी AI चा वापर करून एक नवीन फिचर विकसित करत आहे. "अॅडल्ट क्लासिफायर" नावाचे हे साधन, 18 वर्षांखालील वापरकर्त्यांना ओळखेल आणि त्यांच्या खात्यावर अधिक कडक गोपनीयता सेटिंग्ज लागू करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.