Boeing Starliner Malfunction : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ५ जूनला सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बच विल्मोर हे बॉइंग स्टारलाइनर या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station - ISS) मधून अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. पण आता सुनीता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आता पृथ्वीवर परत येण्यास अडचण येत आहे.
स्टारलाइनर यानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचं पृथ्वीवर येणं लांबणीवर पडलं आहे. यानात हेलियम गळती आणि काही इंजिन बंद पडल्याने परतीचा प्रवास सुरू होऊ शकत नाही. तज्ञांनी या समस्येवर लवकरच तोडगा काढून दोन्ही अंतराळवीरांना सुखरूप पृथ्वीवर आणण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाचा वापर करावा अशी चर्चा सुरू आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते हा एक छोटा बिघाड पृथ्वीवर उतरण्यासाठी धोकादायक ठरतीलच असे नाही. जास्तीत जास्त, अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरच थोडा वेळ स्पेसएक्सच्या ड्रॅगनची वाट पाहावी लागेल इतकंच.
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी Butch Wilmore यांना यापूर्वी दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर जून 5 रोजी स्टारलाइनरद्वारे अंतराळात पाठवण्यात आलं. मात्र 25 तासांच्या प्रवासात यानात हेलियम गळती आणि काही इंजिन बंद पडल्याचं उघड झालं. याबाबत बोलताना बॉइंग स्टारलाइनर कार्यक्रमाचे व्यवस्थापक म्हणाले, हेलियम सिस्टीम अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
अद्याप इंजिनियरिंग टीम या समस्येचं मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.आता नासासह भारतीयांना देखील सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर परतीची आस लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.