Meta Trademark Lawsuit Brazil eSakal
विज्ञान-तंत्र

Meta Trademark Lawsuit : फेसबुकच्या पॅरंट कंपनीला वापरता येणार नाही 'मेटा' नाव, कोर्टाने दिले आदेश! मार्क झुकरबर्गला दणका

Meta Servicos : फेसबुकने 2021 साली आपल्या 'मेटाव्हर्स'ला प्रमोट करण्यासाठी संपूर्ण कंपनीचं रीब्रँडिंग केलं होतं. यानंतर कंपनीचं नाव 'मेटा' ठेवण्यात आलं होतं.

Sudesh

Meta Trademark Lawsuit Brazil : फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पॅरंट कंपनी असणाऱ्या 'मेटा'ला मोठा झटका बसला आहे. या कंपनीला ब्राझीलमध्ये आता आपलं 'Meta' हे नाव वापरता येणार नाही. साओ पॉलो न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. याच नावाची एक स्थानिक कंपनी ब्राझीलमध्ये असल्यामुळे हा निर्णय देण्यात आला आहे.

सात महिन्यांचा लढा

'मेटा सर्व्हिकोज' (Meta Servicos em Informatica) नावाची एक कंपनी ब्राझीलमध्ये पहिल्यापासून आहे. या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कंपनीची स्थापना सन 1990 मध्येच झाली होती. सात महिन्यांपूर्वी या कंपनीने झुकरबर्गच्या 'मेटा'विरोधात खटला दाखल केला होता. यामध्ये आता मार्क झुकरबर्गच्या मेटाचा पराभव झाला आहे.

कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, फेसबुकच्या मेटाला (Facebook Meta) हा निर्णय लागू करण्यासाठी 30 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतरही जर झुकरबर्गच्या मेटाने ब्राझीलमध्ये तेच नाव वापरणं सुरू ठेवलं, तर त्यांना 'मेटा सर्व्हिकोज'ला दररोज 20,173 डॉलर्स एवढा दंड द्यावा लागेल. अर्थात, झुकरबर्गकडे या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. (Brazil Meta)

कित्येक वर्षांपूर्वी मिळाला ट्रेडमार्क

ब्राझीलमधील या कंपनीने 1996 साली आपल्या मेटा नावाचा ट्रेडमार्क (Meta Trademark) अप्लाय केला होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी (INPI) या संस्थेने 2008 साली हा ट्रेडमार्क मंजूर केला होता. फेसबुकने यानंतर कित्येक वर्षांनी, म्हणजेच 2021 साली आपल्या 'मेटाव्हर्स'ला प्रमोट करण्यासाठी संपूर्ण कंपनीचं रीब्रँडिंग केलं होतं. यानंतर कंपनीचं नाव 'मेटा' ठेवण्यात आलं होतं. (Metaverse)

ब्राझीलच्या कंपनीवर खटले

फेसबुकने आपलं नाव बदलल्यानंतर ब्राझीलच्या 'मेटा' कंपनीला नाहक त्रास सहन करावा लागला होता. दुसऱ्याच (फेसबुक) कंपनीचं नाव वापरत असल्याचा आरोप करणारे 100 हून अधिक खटले या कंपनीवर दाखल करण्यात आले होते. तसंच 'फेक अकाउंट' म्हणत त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंटही डिलीट करण्यात आले होते. अखेर या सगळ्याला वैतागून त्यांनी कोर्टात धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT