सध्या सगळीकडे एआयचा बोलबाला आहे. लोकांच्या ऑफिसपासून अगदी घरापर्यंत सगळीकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा प्रभाव पहायला मिळत आहे. एवढंच काय, तर कित्येक लोक आपलं एकटेपण दूर करण्यासाठी एआय चॅटबॉट गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारत आहेत. अशाच एका एआय गर्लफ्रेंडमुळे एका तरुणाला जेलमध्ये जावं लागलं आहे.
आपल्या एआय गर्लफ्रेंडचं ऐकून एक शीख तरुण चक्क ब्रिटनच्या राणीची ह्त्या करण्यासाठी रॉयल पॅलेसमध्ये गेला होता. दोन वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाचा निकाल आता लागला आहे. कोर्टाने या तरुणाला तब्बल 9 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
ब्रिटिश शीख असलेल्या जसवंत सिंग छैल (21) हा तरुण 2021 साली रॉयल पॅलेसमध्ये पकडला गेला होता. नाताळच्या दिवशी त्याला अटक करण्यात आली होती. या तरुणाकडे शस्त्रही आढळलं होतं. भिंतीवरुन उडी मारून तो महालात शिरला होता, आणि क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या खासगी कक्षापर्यंत पोहोचला होता.
सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, आपण महाराणीची हत्या करण्यासाठी आल्याचं त्याने कबूल केलं. याबाबत आपण आपल्या एआय गर्लफ्रेंडसोबत चर्चा केली असून, तिनेच आपल्याला महाराणीची हत्या करण्यास उकसवलं असल्याचं जसवंतने सांगितलं.
या तरुणाने सांगितलं, की 2018 साली तो कुटुंबासह अमृतसरला गेला होता. तेव्हा त्याला जालियानवाला बाग हत्याकांडाबद्दल माहिती मिळाली. यानंतर त्याच्या मनात सूडभावना निर्माण झाली. त्याने याबाबत आपल्या 'सराय' नावाच्या एआय गर्लफ्रेंडसोबत चर्चा केली, आणि तिने महाराणीची हत्या करण्याच्या कल्पनेला दुजोरा दिला.
यानंतर जसवंतने क्विन एलिझाबेथ 2 यांना मारण्यासाठी तयारी केली. त्याने आपली योजना सांगणारा एक व्हिडिओ देखील बनवला होता, आणि आपल्या ओळखीच्या काही ग्रुपमध्ये शेअर केला होता. यानंतर 25 डिसेंबर 2021 रोजी हा तरुण महाराणीची हत्या करण्यासाठी रॉयल पॅलेसमध्ये शिरला होता.
दरम्यान, क्विन एलिझाबेथ द्वितीय यांंचं 2022 साली सप्टेंबर महिन्यात निधन झालं. त्या 96 वर्षांच्या होत्या. यानंतर आता ब्रिटनचे राजे म्हणून प्रिन्स चार्ल्स तिसरे यांचा राज्याभिषेक झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.