New BSA Scrambler Debuts: ब्रिटिश कंपनी BSA मोटरसायकलने आपली नवीन कॉन्सेप्ट बाईक BSA Scrambler 650 ला सादर केले आहे. लाँचनंतर BSA Scrambler रॉयल एनफील्डच्या ६५०सीसी बाईकला टक्कर देण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, कंपनी स्क्रॅम्बलर ६५० ला २०२३ मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. याआधी कंपनीने डिसेंबर २०२१ मध्ये गोल्ड स्टार ६५०सीसी रेट्रो-स्टाइल बाईकला सादर केले होते.
हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
बाईकच्या लूकबद्दल सांगायचे तर ही एकदम रफ अँड टफ दिसून येते. यात वायर-स्पोक व्हीलिस, फ्रंट फेंडर, सिंगल-सीट आणि हेडलाइट ग्रील देण्यात आली आहे. BSA ने हे केवळ कॉन्सेप्ट मॉडेल असल्याचे म्हटले आहे. बाईकमध्ये लाँग ट्रॅव्हल सस्पेंशन, नॉबी टायर दिला असून, यात २८ साइड प्लेट आहे.
या कॉन्सेप्ट बाईकमध्ये ६५२सीसी, लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हेच इंजिन गोल्ड-स्टारमध्ये देखील मिळते. इंजिन ४६ बीएचपी पॉवर आणि ५५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत ५-स्पीड गियरबॉक्स दिला आहे. बीएसए स्क्रॅम्बलर ६५० मध्ये सिंगल ब्रेक डिस्कसह मोठे फ्रंट व्हील, एक ड्यूल-एग्जॉस्ट पाइप आणि रियरला ड्यूल शॉर्क एब्जॉर्बर दिले आहे.
तसेच, यात देण्यात आलेले हेडलाइट कव्हर, रुंद हँडलबार आणि वायर-स्पोक व्हील हे बाईकच्या ऑफ-रोड स्टाइलला दर्शवतात. यामध्ये सेमी-डिजिटल लेआउटचा ट्विन-पॉड इंस्ट्रूमेंट कंसोल दिला जाऊ शकतो. डाव्या बाजूला एक अॅनालॉग स्पीडोमीटर आणि ओडोमीटरसाठी एलसीडी आहे. तर उजव्या बाजूला टॅकोमीटर आणि एक डिजिटल फ्यूल गेज मिळेल.
या बाईकला खासकरून लांबचा प्रवास करणाऱ्या चालकांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. डायमेंशनबद्दल सांगायचे तर याचा व्हीलबेस १४२५एमएम, सीटची उंची ७८०एमएम आणि रेक २६.५ डिग्री आहे. यात १२ लीटरचा फ्यूल टँक दिला आहे. बाईकचे वजन २१३ किलो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.