BSNL 4G Network connectivity expands in remote areas : देशभरातील दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएलने मोठे काम केले आहे. बीएसएनएलने ५०,००० नवे 4G टॉवर्स बसवले असून, यापैकी ४१,००० टॉवर्स आता कार्यरत झाले आहेत. या टॉवर्सद्वारे बीएसएनएलने अनेक दुर्गम आणि नेटवर्कच्या बाहेर असलेल्या भागांमध्ये जलद इंटरनेट सेवा पुरवली आहे. विशेष म्हणजे, BSNL ने ५,००० टॉवर्स अशा ठिकाणी बसवले आहेत जिथे Airtel, Jio आणि Vodafone-Idea सारख्या खाजगी सेवा पुरवठादारांचे नेटवर्कही उपलब्ध नव्हते.
BSNL च्या या प्रगतीने खाजगी टेलिकॉम कंपन्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भारतातील सुमारे ९५ टक्के ठिकाणी नेटवर्क पोहोचले आहे, मात्र BSNL आता उर्वरित दुर्गम भागांपर्यंत आपली सेवा नेण्यावर भर देत आहे. पुढील वर्षाच्या जूनपर्यंत BSNL ने एक लाख 4G टॉवर्स बसवण्याचे लक्ष्य ठरवले आहे, जेणेकरून देशातील दूरसंचार सेवा आणखी मजबूत होईल.
यातच, गेल्या काही महिन्यांत खाजगी कंपन्यांनी रिचार्ज दरवाढ केली असताना BSNL ला ५.५ दशलक्ष नवीन ग्राहक मिळाले आहेत. याउलट, खाजगी कंपन्यांना ग्राहक गमवावे लागले आहेत, त्यात Jio ने सुमारे ४ दशलक्ष ग्राहक गमावले आहेत. तरीही, Jio ला आपल्या जुन्या ग्राहकांची परती होण्याची आशा आहे.
BSNL केवळ 4G वरच थांबत नाही, तर लवकरच 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने 4G आणि 5G टॉवर्स उभारण्यावर BSNL भर देत आहे. त्यामुळे BSNL चे ग्राहक आता उच्च दर्जाची इंटरनेट सेवा आणि सुलभ कनेक्टिव्हिटीचा लाभ घेऊ शकतील.
शिवाय, BSNL ने आपल्या रिचार्ज प्लॅन्सचा दर कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे ग्राहकांना स्वस्तात सेवा मिळू शकतील.
भारत मोबाइल काँग्रेसमध्ये BSNL ने स्पष्ट केले की, ग्राहकांची वाढ हा त्यांच्या प्राधान्याचा विषय आहे आणि त्यासाठी ते सेवा दर्जामध्ये सतत सुधारणा करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.