Recharge Plan Sakal
विज्ञान-तंत्र

Recharge Plans: अवघ्या ९४ रुपयांच्या रिचार्जमध्ये दीड महिना सुरू राहील तुमचा मोबाईल नंबर, बेनिफिट्स पाहाच

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे ९४ रुपयांचा स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा, कॉलिंगसह अनेक फायदे मिळतील.

सकाळ डिजिटल टीम

BSNL Mobile Recharge Plans: भारतीय टेलिकॉम क्षेत्रात ठराविकच कंपन्यांचा दबदबा पाहायला मिळतो. खासकरून खासगी कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन-आयडिया याच कंपन्या बाजारात आहेत. या व्यतिरिक्त आणखी एक कंपनी म्हणजे बीएसएनएल (BSNL) आहे. खासगी कंपन्यांमुळे बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या गेल्या काही वर्षात कमी झाली आहे. असे असले तरीही कंपनीकडे स्वस्त प्लॅन्सची मोठी लिस्ट आहे.

बीएसएनएल कमी किंमतीत येणाऱ्या रिचार्जमध्ये शानदार बेनिफिट्स देत आहे. आम्ही तुम्हाला अशाच एका रिचार्जबद्दल सांगणार आहोत, ज्या प्लॅनची वैधता ४५ दिवस आहे. तुम्ही जर दोन सिम कार्ड वापरत असाल व केवळ मोबाइल नंबर सुरू ठेवायचा असल्यास हा प्लॅन फायद्याचा ठरेल. या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

BSNL कडे आहे ९४ रुपयांचा शानदार प्रीपेड प्लॅन

सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएलकडे ९४ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता ४५ दिवस आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटासह अनेक फायदे मिळतील. म्हणजेच, एकदा रिचार्ज केल्यावर तुमचा मोबाइल नंबर दीड महिना सुरू राहील. या रिचार्जद्वारे तुम्हाला लोकल आणि नॅशनल कॉलिंगचा फायदा मिळेल. प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी २०० मिनिटं मिळतात.

एकदा रिचार्ज केल्यावर तुम्ही देशभरात कोणत्याही नेटवर्कवर सहज कॉल करू शकता. यामध्ये तुम्हाला ४५ दिवसांसाठी ३ जीबी डेटाचा देखील फायदा मिळतो. मात्र, लक्षात घ्या की प्लॅनमध्ये डेली डेटाची सुविधा मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT