bsnl 997 plan vs jio 999 recharge plan which best for you know details benefits and validity Sakal
विज्ञान-तंत्र

Jio च्या रिचार्जला BSNL ची टक्कर; १६० दिवसांच्या प्लानमध्ये तुमच्या पैशांचीही होईल बचत

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

Mobile Recharge Plan : रिलायन्स जिओने आपले दर महाग केले आहेत. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या टेलिकॉम कंपनीने आपल्या 45 कोटींहून अधिक मोबाईल फोन वापरकर्त्यांना महागाईचा मोठा धक्का दिला आहे. प्लानमध्ये जवळपास 22 टक्के वाढ करण्यात आली आहे. यामुळे बहुतेक लोक बीएसएनएलकडे वळत आहेत.

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने कोणत्याही प्लानच्या दरात वाढ केलेली नाही, ज्यामुळे BSNL प्लॅन अजूनही लोकांना कमी किमतीत उत्तम फायदे आणि वैधता देत आहेत.

आज आपण BSNL 997 प्लॅन आणि Jio 999 प्लॅनची ​​तुलना करणार आहोत त्याच्या वैधतेच्या बाबतीत किमतीबाबत कोणता रिचार्ज प्लॅन फायदेशीर ठरताे.

BSNL 997 रिचार्ज प्लॅन

997 रुपयांच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2 GB हायस्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ दिला जाईल. 160 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना काही ॲप्सचा विनामूल्य प्रवेश देखील दिला जाईल. वापरकर्त्यांना एकूण 320 GB हायस्पीड डेटा मिळेल.

Jio 999 रिचार्ज प्लॅन

999 रुपयांच्या Jio प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB हायस्पीड डेटा, दररोज 100 SMS आणि मोफत अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. 98 दिवसांची वैधता असलेला हा प्लान वापरकर्त्यांना एकूण 196 GB हाय स्पीड डेटा मिळताे. तसेच या प्लॅनमध्ये जीओच्या तीन ॲप्सचा समावेश आहे.

BSNL VS Jio: दोन्ही प्लॅनमध्ये काय फरक आहे ?

दोन्ही प्लॅनच्या किमतीमध्ये केवळ 2 रुपयांचा फरक आहे. मात्र तुम्हाला दोन्ही प्लॅनच्या वैधतेमध्ये लक्षणीय फरक दिसेल, जिओ प्लॅन केवळ 98 दिवसांच्या वैधतेसह येतो, तर बीएसएनएल प्लॅनची ​​वैधता १६० दिवसांची मिळते. डेटामधील फरकाबद्दल सांगायचे झाल्यास, BSNL कंपनीच्या प्लानमध्ये Jio पेक्षा 124 GB जास्त डेटा मिळतो. एकूणच, बीएसएनएल प्लानची किंमत जिओच्या तुलनेत कमी आहे परंतु डेटा आणि वैधतेच्या बाबतीत, बीएसएनएलने आपल्या ग्राहकांची मने जिंकली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT