BSNL Network Simcard Vending Machine : बीएसएनएलने भारतातील ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे आता ग्राहकांना सिम कार्ड खरेदी करण्यासाठी दुकानात जाण्याची गरज नाही. भारत मोबाइल कॉंग्रेस २०२५ मध्ये दिल्ली येथे बीएसएनएलने सिम कार्ड व्हेंडिंग मशीन सादर केले. हे मशीन एटीएमप्रमाणे कार्य करते आणि ग्राहक बीएसएनएल सेल्फ केअर अॅपच्या मदतीने कोणत्याही वेळी सिम कार्ड खरेदी करू शकतात.
हे व्हेंडिंग मशीन रेल्वे स्थानक, विमानतळ यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत, ज्यामुळे लोकांना सिम कार्ड मिळवणे अधिक सुलभ होणार आहे. बीएसएनएल या सेवेद्वारे आपल्या ग्राहकसंख्या वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. या सोबतच, बीएसएनएल लवकरच देशभरात 4G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे आणि 5G तंत्रज्ञानासाठी चाचणीसुद्धा सुरू केली आहे.
बीएसएनएलने सांगितले की, त्यांचे 5G नेटवर्क पुढील वर्षाच्या जून महिन्यापासून सुरू होईल. सिम व्हेंडिंग मशीन ही सेवा विशेषतः त्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल, ज्यांना दूरसंचार कार्यालयात जाऊन सिम कार्ड खरेदी करायचे नसते.
बीएसएनएलने या तंत्रज्ञानासोबत 'इंटेलिजंट व्हिलेज' आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे नवीन तंत्रज्ञान देखील सादर केले आहे, जे नको असलेल्या कॉल्सची समस्या सोडवण्यात मदत करेल.
स्पॅम कॉल्सशी लढा देण्यासाठी, बीएसएनएलने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून स्पॅम कॉल्स ओळखणारी नवीन प्रणाली दाखवली आहे. या सोबतच, बीएसएनएलने त्यांच्या सॅटेलाइटद्वारे इंटरनेट आणि कॉलिंग सेवा दाखवली. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बीएसएनएलने आंतरराष्ट्रीय कंपनी व्हायसॅटसोबत भागीदारी केली आहे, जी विशेषतः संरक्षण दलांसाठी उपयुक्त ठरेल.
बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, पुढील सहा महिन्यांत सुधारित सेवा उपलब्ध होईल. कंपनीने जवळपास 1 लाख मोबाईल टॉवर्स 4G सेवेत अपग्रेड करण्याची योजना आखली आहे, जे सध्या 24,000 टॉवर्सवर कार्यरत आहे. 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेअंतर्गत बीएसएनएलने स्वदेशी तंत्रज्ञानावर भर देण्याचा संकल्प केला आहे.
यासोबतच, बीएसएनएलने ग्राहकांसाठी आणखी तंत्रज्ञानाचे नवप्रयोग सादर केले आहेत, ज्यात वर्च्युअल रिअॅलिटीसह अनेक महत्त्वाच्या तांत्रिक प्रगतींचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.