BSNL google
विज्ञान-तंत्र

BSNL offer : हा १९ रुपयांचा रिचार्ज करा आणि फोन महिनाभर चालवा

जिओ आणि एअरटेलला मागे टाकण्यासाठी, देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने एक जबरदस्त योजना आणली आहे.

नमिता धुरी

मुंबई : आजकाल देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्या यूजर्सना खूश ठेवण्यासाठी नवनवीन प्लान आणत आहेत, ज्यांना लोकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. जिओ आणि एअरटेलला मागे टाकण्यासाठी, देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने एक जबरदस्त योजना आणली आहे. अतिशय कमी किंमतीत महिन्याभराचे लाभ या योजनेत उपभोगता येणार आहेत.

बीएसएनएल प्लॅनची ​​खासियत जाणून घ्या

बीएसएनएलच्या १९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनने सध्या बाजारात खळबळ उडवून दिली आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची वैधता महिनाभर राहाते. वास्तविक, या योजनेचा मुख्य उद्देश नंबर चालू ठेवण्याची सुविधा प्रदान करणे हा आहे. या प्लॅनची ​​वैधता ३० दिवसांसाठी उपलब्ध आहे.

तसेच, हे रिचार्ज केल्यानंतर, तुमचा कॉलरेट २० पैसे होतो. या रिचार्जचे वैशिष्ट्य म्हणजे तो केल्यानंतर तुम्हाला महिनाभर रिचार्जचे टेन्शन घेण्याची गरज नाही. एकदा रिचार्ज केल्यानंतर, तुमचा फोन महिनाभर चालेल. संपूर्ण महिनाभर तुम्ही कॉल्स ऐकू शकता आणि तुम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही.

BSNL चा ७५ रुपयांचा प्लॅन मन जिंकत आहे

बीएसएनएलचा हा प्लॅनही मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी २०० मिनिटे मिळतात. तुम्ही त्यांचा वापर स्थानिक आणि राष्ट्रीय कॉलिंगसाठी करू शकता. यासोबत तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी 2 GB डेटा मिळेल.

जर तुम्ही असा प्लान शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला कॉलिंग आणि डेटा दोन्ही मिळतील आणि स्वस्त देखील असेल, तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम प्लान ठरू शकतो. या प्लॅनचा एकमात्र दोष म्हणजे यात एसएमएसचा फायदा मिळणार नाही.

जर तुम्ही अशा प्लानचा विचार करत असाल ज्यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि डेटा मिळेल तर, तुमच्यासाठी १४७ रुपयांचा प्लॅन योग्य ठरेल. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे आणि तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा पर्याय मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी 10GB डेटा देखील मिळतो. तसेच, यामध्ये मोफत बीएसएनएल ट्यूनदेखील उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : नागपूरमध्ये शहा, खर्गे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

SCROLL FOR NEXT