BSNL 
विज्ञान-तंत्र

BSNL चा 84 दिवसांचा प्लॅन, सोबत 5GB डेटा, फ्री कॉलसह OTT बेनिफिट्स

सकाळ डिजिटल टीम

BSNL अशा अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर करते ज्यामध्ये ग्राहकांना अनेक अप्रतिम फायदे दिले जातात. या प्लॅनमध्ये फक्त अमर्यादित कॉलिंग आणि डेटाच मिळत नाहीत तर काही प्लॅनमध्ये OTT बेनिफिट्स देखील दिले जातात. आज आपण BSNL च्या अशा तीन प्रीपेड प्लॅनची ​​यादी पाहाणार आहोत जे डेटा आणि व्हॉइस कॉल तसेच इतरही अनेक बेनिफिट्स देतात.

- यादीतील पहिला प्रीपेड प्लॅन BSNL द्वारे ऑफर केलेली STV_429 प्लॅन आहे जो OTT प्लॅटफॉर्मवर एक्सेससह येतो. 429 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 81 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 1GB डेटा देखील उपलब्ध आहे. एवढेच नाही तर प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना इरॉस नाऊ इंटटेनमेंट सेवा तसेच दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. वेबसाइटवरील 'व्हॉईस व्हाउचर' सेक्शनमध्ये हा प्लॅन खरेदी करता येईल.

या यादीत पुढचा प्लॅन हा डेटा-ओरिएंटेड प्रीपेड प्लॅन आहे. हा प्लॅन 447 रुपयांच्या किंमतीसह येतो आणि एकूण 100GB हाय-स्पीड डेटा ऑफर करतो. 100GB डेटाची डेटा मर्यादा संपल्यानंतर, वापरकर्त्याला 80Kbps चा इंटरनेट स्पीड मिळेल. प्लॅनमध्ये 60 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. जरी कंपनीने वेबसाइटवर 'डेटा व्हाउचर' म्हणून याचा उल्लेख केला असेल, तरीही हा प्लॅन दररोज 100 एसएमएससह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग ऑफर करतो. STV_447 प्लॅन मध्ये वापरकर्त्यांना BSNL Tunes आणि Eros Now Entertainment Services चे सदस्यत्व देखील मिळते.

बीएसएनएलने ऑफर केलेल्या जास्त दिवसांच्या डेटा प्रीपेड प्लॅन या यादीतील शेवटचा प्लॅन आहे. STV_WFH_599 नावाचा BSNL च्या या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 599 रुपये आहे. प्लॅनमध्ये दररोज 5GB डेटा उपलब्ध आहे. डेली डेटा मर्यादा संपल्यानंतर, वापरकर्त्यास 80Kbps चा इंटरनेट स्पीड मिळेल. याशिवाय, या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. वापरकर्त्यांना खरोखर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतात, ज्यात मुंबई आणि दिल्ली रोमिंगमध्ये होम LSA आणि राष्ट्रीय रोमिंगचा समावेश आहे. प्लॅन ZING स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची सदस्यता देखील देतो जे वापरकर्त्यांना हजारो गाणी, चित्रपट आणि इतर मनोरंजन कंटेंटचा एक्सेस देते. या प्लॅनचा आणखी एक फायदा म्हणजे यूजर्सला रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अमर्यादित मोफत नाईट डेटा मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयी उमेदवाराचे औक्षण करताना रसायनयुक्त गुलालामुळे उडाला भडका; सहा ते सात कार्यकर्ते भाजले, नेमकं काय घडलं?

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपालांची घेणार भेट

खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध ए आर रहमानने जारी केली कायदेशीर नोटीस ; "या अफवेमुळे माझ्या कुटूंबाला त्रास..."

SCROLL FOR NEXT