BSNL Live TV Service Testing esakal
विज्ञान-तंत्र

BSNL Live TV : सुरू झालीये BSNL लाईव्ह टीव्ही टेस्टिंग; कशी वापराल फ्री सुविधा,लगेच जाणून घ्या

Saisimran Ghashi

BSNL Live TV Service: BSNL ग्राहकांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. BSNL ने त्यांची नवीन लाईव्ह टीव्ही सेवा चाचणीसाठी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, ही सेवा सध्या पूर्णपणे मोफत आहे. ही लाईव्ह टीव्हीची सुविधा मोफत असणार आहे आणि काही OTT प्लॅटफॉर्म हे अत्यल्प दरात उपलब्ध असणार आहेत.

या अगदी वेगळ्या आणि आकर्षक सेवेचा फायदा तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे BSNL ची FTTH इंटरनेट कनेक्शन आणि Android स्मार्ट टीव्ही (व्हर्जन 10 किंवा त्यापुढील) असेल. ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे पॅक घेण्याची गरज नाही. तुमच्या वैध असलेल्या FTTH प्लॅनमध्येच ही सेवा समाविष्ट आहे. त्यामुळे लगेचच अ‍ॅप डाउनलोड करा आणि मोफत लाईव्ह टीव्हीचा आनंद घ्या.

या सेवेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला Google Play Store वरून एक अॅप डाउनलोड करावं लागणार आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.streaming.bsnllivetv या लिंकवर क्लिक करून तुम्ही अॅप डाउनलोड करू शकता. अॅप डाउनलोड झाल्यानंतर 9424700333 या मोबाईल नंबरवर एक मिस्ड कॉल करा. तुमचा नंबर नोंद झाल्यानंतर तुमच्या स्मार्ट टीव्हीवर BSNL Live TV अॅप इन्स्टॉल होईल.

या चाचणीच्या टप्प्यात तुम्हाला कोणतेही अतिरिक्त डाटा शुल्क लागणार नाही किंवा तुमच्या अस्तित्वात असलेल्या FTTH प्लॅनमधूनही कोणताही डाटा कट होणार नाही.

यापूर्वी BSNL ने फायबर ऑप्टिक्सच्या माध्यमातून 130 रुपये प्रति महिना इतक्या किमतीमध्ये त्यांची इंटरनेट प्रोटोकॉल टेलीव्हिजन (IPTV) सेवा सुरु केली होती. ही सेवा आताही उपलब्ध आहे आणि ती देखील खूपच किफायतशीर आहे. परंतु, ज्यांच्याकडे स्मार्ट टीव्ही आहे त्यांच्यासाठी हा नवीन पर्याय अधिक सोयीस्कर ठरू शकतो.

ही चाचणी सध्या मध्य प्रदेश मध्ये सुरू आहे. लवकरच संपूर्ण भारतभर सुरू होईल. त्यामुळे आता लवकरच BSNL अॅप डाउनलोड करून मोफत लाईव्ह टीव्हीचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Backward Class Reservation : मागासवर्गीयांच्या जागेचे आरक्षण बदलासाठी सूचना! नवीन वाद उद्भवण्याची शक्यता

राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारण्यात येणार; आयुर्मान असणार 100 वर्षे

Viral Video: डॉक्टरांच्या वार्षिक परिषदेत तरुणीचा डान्स; सोशल मीडियावर चर्चेला फुटलं तोंड; पाहा व्हिडिओ

Virat Kohli Ranji Trophy : विराट कोहलीची रणजी संघासाठी संभाव्य खेळाडूंमध्ये निवड, २०१९ नंतर प्रथमच देशांतर्गत क्रिकेट खेळणार?

Share Market Opening: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; सेन्सेक्स 160 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT