विज्ञान-तंत्र

BSNLचा नवीन रिचार्ज प्लॅन; फक्त १०७ रुपये भरा आणि मिळवा एवढा डेटा

BSNL 107 प्रीपेड प्लॅन घेतल्यानंतर, तुम्ही त्यात उपलब्ध सुविधांचा २४ दिवसांसाठी लाभ घेऊ शकता. म्हणजेच या प्लॅनची ​​वैधता २४ दिवसांची आहे.

नमिता धुरी

मुंबई : BSNL ने एक नवीन प्लॅन आणला आहे. याला BSNL 107 प्रीपेड प्लॅन असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये यूजर्सना अनेक प्रकारच्या सुविधा मिळत आहेत ज्या इतर कोणत्याही कंपनीच्या रिचार्जमध्ये मिळत नाहीत. हा प्लान खरेदी केल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स, एसएमएसची सुविधा मिळते.

BSNL 107 प्रीपेड प्लॅन घेतल्यानंतर, तुम्ही त्यात उपलब्ध सुविधांचा २४ दिवसांसाठी लाभ घेऊ शकता. म्हणजेच या प्लॅनची ​​वैधता २४ दिवसांची आहे. तुम्ही मुंबई आणि दिल्ली येथे MTNL नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग करू शकता. यात तुम्हाला एका दिवसात २५० मिनिटे मिळतात. हे संपल्यानंतर, तुमच्याकडून बेस प्लान टॅरिफच्या आधारे शुल्क आकारले जाईल.

तुम्हाला किती डेटा मिळतो

बीएसएनएलच्या या प्लॅनची खासियत म्हणजे यामध्ये तुम्हाला दररोज १ जीबी डेटा मिळेल. त्यानुसार १०७ रुपयांच्या रिचार्जवर एकूण २४ जीबी डेटा मिळणार आहे. एमटीएनएल दिल्ली आणि मुंबईसाठी दररोज १०० एसएमएस दिले जातील. बीएसएनएलचा हा प्लान सर्वाधिक विकतो. याचे कारण त्यात मिळणाऱ्या सुविधा वेगळ्या आहेत. तुम्हालाही हा रिचार्ज करायचा असेल, तर तुम्ही बीएसएनएलच्या अधिकृत साइटवरून करू शकता.

BSNL 197 प्रीपेड प्लॅन-

BSNL च्या 197 प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. यामध्ये दिल्ली आणि मुंबई एमटीएनएल कॉलिंग देखील उपलब्ध आहे. तसेच, हा प्लान खरेदी केल्यावर तुम्हाला 2GB/दिवस डेटा मिळेल. हे संपल्यानंतर, डेटा स्पीड 80Kbps पर्यंत कमी होईल. यासोबतच 100 एसएमएस/दिवसही यामध्ये उपलब्ध आहेत. झिंग आणि इतर सर्व गोष्टी १८ दिवसांपर्यंत मिळू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT