Rakshabandhan 2024 Best Gadgets to Gifts for sister esakal
विज्ञान-तंत्र

Raksha Bandhan Budget Gifts : यंदाचं रक्षाबंधन लाडक्या बहिणीसाठी बनवा एकदम खास! तुमच्या प्रेमाला द्या 'या' बजेट ई-गिफ्ट्सची जोड

Raksha Bandhan Electronic Gadget Gifts Ideas : यंदाच्या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या बहिणीला अत्याधुनिक आणि उपयुक्त असे बजेटमध्ये असलेले टेक्नो गिफ्ट्स देऊ शकता.

Saisimran Ghashi

Raksha Bandhan Special Gift Ideas : रक्षाबंधनाच्या खास दिवशी बहिणीला खास गिफ्ट द्यायचंय? मग यावर्षी तिला अत्याधुनिक आणि उपयुक्त असं टेक्नो गिफ्ट देऊन बघा. 2,000 रुपयांच्या आत तुम्हाला एकदम बेस्ट गिफ्ट खरेदी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

सुंदर केसांसाठी हेअर ड्रायर

तुमच्या बहिणीला केसांची खूप काळजी असते. मग तिला हेअर ड्रायर गिफ्ट करा. फिलिप्स, नोवा, सिस्का यासारख्या अनेक कंपन्यांचे हेअर ड्रायर बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या बजेटमध्ये बसणारा आणि बहिणीच्या केसांसाठी उत्तम असं हेअरड्रायर तुम्ही निवडू शकता.

हेअर स्ट्रेटनर

सलूनमध्ये न जाताच केसांना स्टाइल देण्यासाठी हेअर स्ट्रेटनर खूप उपयुक्त आहे. हे केसांना सरळ, गुंतागुंतीविरहीत आणि चमकदार बनवते. फिलिप्स, नोवा, हवेल्स यासारख्या अनेक कंपन्यांचे हेअर स्ट्रेटनर बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या बहिणीच्या केसांच्या प्रकारानुसार हेअर स्ट्रेटनर निवडा.

Hair Dryerand Hair straightner

म्युझिक आणि कॉलसाठी ईअरबड्स

संगीत ऐकण्यासाठी, कॉल घेण्यासाठी आणि अभ्यासासाठी ईअरबड्स खूप उपयुक्त आहेत. बाजारात नॉइज कॅन्सलेशन आणि ट्रू वायरलेस टेक्नॉलॉजी असलेले अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. हे ईअरबड्स 1,000 ते 2,000 रुपयांच्या किंमतीमध्ये उपलब्ध आहेत.

डिजिटल फोटो फ्रेम

फोटो फ्रेममध्येही टेक्नॉलॉजीच आहे. आठवणी जपण्यासाठी आता फोटो फ्रेमऐवजी डिजिटल फोटो फ्रेम घेऊ शकता. यामध्ये शेकडो फोटो एकाच वेळी दाखवता येतात आणि तुमच्या आठवणी जपण्याचा हा एक मनोरंजक मार्ग आहे. 2,000 रुपयांच्या आत तुम्हाला वेगवेगळ्या फीचर्ससह डिजिटल फोटो फ्रेम मिळतील.

Ear Buds and Digital Frame

पॉवर बँक

सध्याच्या काळात स्मार्टफोन ही आपली सर्वांची गरज बनली आहेत. पण त्यांची बॅटरी लाइफ कमी असल्यामुळे अडचण येते. अशा वेळी पॉवर बँक तुमची खूप मदत करते. वेगवेगळ्या क्षमतेच्या पॉवर बँक्स तुम्हाला 2,000 रुपयांच्या आत सहज मिळतील.

Power Bank And Smartwatch

स्मार्टवॉच

स्मार्टवॉचने आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. तुमच्या फोनमध्ये येणारी मेसेज, कॉल आणि नोटिफिकेशन्स स्मार्टवॉचवर पाहायला मिळतात. तसेच तुमच्या फिटनेसचाही माग ठेवू शकता आणि आरोग्य सुधारणा करण्यासाठी देखील स्मार्टवॉच उपयुक्त आहे. काही स्मार्टवॉचमध्ये GPS आणि हार्ट रेट मॉनिटरची सुविधाही असते. Boat, Noise यासारख्या कंपन्यांच्या स्मार्टवॉच 2,000 रुपयांच्या आत सहज मिळतात.

या रक्षाबंधनाला बहिणीला काही हटके गिफ्ट द्या आणि तिचा दिवस अन् यंदाच रक्षाबंधन एकदम खास बनवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Manifesto 2024: मुंबईत अमित शहांची पत्रकार परिषद सुरु असताना तरुण उठला अन्......

Nitin Gadkari: भाजपचं पीक वाढलंय, रोग लागतो आता फवारण्याची गरज; नितीन गडकरींनी का व्यक्त केली चिंता?

BJP Manifesto 2024: भाजपच्या जाहीरनाम्यात 'विकसित महाराष्ट्र' संकल्पना; शेतकऱ्यांसाठी हमीभाव, बहिणींना भेट म्हणून २१०० रुपये

Dharashiv Assembly Election 2024 : धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेत थेट लढत!

Star Pravah : मृणाल दुसानिस आणि ज्ञानदा रामतीर्थकरचा मालिकेत कमबॅक ; नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस

SCROLL FOR NEXT