Electric Cars esakal
विज्ञान-तंत्र

Electric Cars : हुशार असाल तर 2025 आधी इलेक्ट्रिक कार खरेदी करू नका, खुद्द कियाच्या नॅशनल हेडने सांगितलं कारण

किया इंडियाचे नॅशनल सेल्स अँड मार्केटिंग हेड हरदीप सिंह बरार यांच्या मते ग्राहकांनी २०२५ आधी इलेक्ट्रिक कार खरेदीवर एकदा पूनर्विचार केलेलाच बरा.

साक्षी राऊत

Electric Cars : हल्ली इलेक्ट्रीक कारची क्रेझ ग्राहकांमध्ये प्रचंड वाढलेली दिसते. भारतातील वाहन निर्मिती कंपन्यांबरोबरच इतर विदेशी कंपन्यासुद्धा त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या व्यवसाय विस्ताराकडे लक्ष केंद्रित करताना दिसतात. इलेक्ट्रिक कार्सच्या शर्यतीत टाटा मोटर्स, महिंद्रा, ह्युंदाई, एमजी मोटर्स आणि किया इंडिया यांसारख्या ब्रँडचा समावेश आहे. मात्र किया इंडियाचे नॅशनल सेल्स अँड मार्केटिंग हेड हरदीप सिंह बरार यांच्या मते ग्राहकांनी २०२५ आधी इलेक्ट्रिक कार खरेदीवर एकदा पूनर्विचार केलेलाच बरा.

काही वर्षांपूर्वी, Kia India ने बाजारात आपली नवीन Seltos फेसलिफ्ट सादर केली होती. या SUV सह, Kia ने भारतीय बाजारपेठेत सुमारे 4 वर्षांपूर्वी पाऊल ठेवले होते आणि आता हीच कार अपडेट करून मार्केटमध्ये सादर केली आहे. यावेळी, किया इंडियाचे नॅशनल सेल्स अँड मार्केटिंगचे प्रमुख हरदीप सिंग बरार यांनी आज तक वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत असे सांगितले की, सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची योग्य वेळ नाही.

इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये सध्या कोणत्या प्रकारची आव्हाने दिसून येतात असे जेव्हा त्यांना विचारण्यात आले तेव्हा बरार म्हणाले की, सध्या इलेक्ट्रिक व्हेइकलच्या सेगमेंटमध्ये ३-४ मोठी आव्हानं आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षे तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची घाई करू नका.

इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटपुढे ही आहेत ४ मोठी आव्हानं

  • इलेक्ट्रिक गाड्या बाजारात कमी असल्याने त्यांच्या निवडीचे कमी ऑप्शन्स सध्या ग्राहकांपुढे आहेत

  • पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार फार महागड्या आहेत. या कार्सच्या किंमती तब्बल ७०-८० टक्क्यांनी महाग आहेत.

  • चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता हे सुद्धा Ev- सेंगमेंटपुढे एक मोठे आव्हान आहे.

  • हरदीप सिंह यांच्या मते, 2025 पर्यंत मार्केटमध्ये अशा इलेक्ट्रिक वाहनांची एन्ट्री होईल ज्यांची रेंजही जास्त असेल आणि इलेक्ट्रिक इंफ्रास्ट्रक्चरही सुधारेल. बरार यांच्या मते, २०२५ नंतर इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ग्राहकांसाठी फायद्याचे ठरेल. (Technology)

Kia लवकरच बाजारात आणणार सर्वाधिक विक्री होणारी कार

Kia लवकरच सर्वाधिक विकली जाणारी कार मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. या सेगमेंटमध्ये कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये आधीच Kia EV6 इलेक्ट्रिक एसयूव्ही ही प्रिमीयम इलेक्ट्रिक कार आहे. या कारची किंमत ६० ते ६५ लाखांत आहे. ड्रायव्हिंग रेंजबाबत बोलायचे झाल्यास कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक कार ७०८ सिंगल चार्जिंगमध्ये ७०८ किमी पर्यंतची रेंज देते. (Electric Vehicle)

मात्र ही कार फारच महागडी म्हणजेच सामान्य माणसाच्या बजेटच्या बाहेरची असणार आहे. अशात कंपनी आणखी एक कार बाजारात लाँच करण्याची योजना आखत आहे जी कमी किंमतीत जास्त रेंज देईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT