Car Pollution Chemicals Risk of Cancer esakal
विज्ञान-तंत्र

Cancer Risk : मोटारीतील रसायनांमुळे कर्करोगाचा धोका? ‘एनजीटी’ची रस्ते वाहतूक मंत्रालयाला नोटीस

Car Pollution Chemicals Risk of Cancer : देशातील ९० टक्के मोटारींमध्ये आगीच्या प्रतिबंधासाठी ज्या रसायनांचा वापर केला जात आहे, त्यामुळे प्रवाशांना कर्करोग होण्याचा धोका संभवतो.

Saisimran Ghashi

देशातील ९० टक्के मोटारींमध्ये आगीच्या प्रतिबंधासाठी ज्या रसायनांचा वापर केला जात आहे, त्यामुळे प्रवाशांना कर्करोग होण्याचा धोका संभवतो. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासह चार विभागांना नोटीस पाठवून उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) रसायनांच्या परिणामांची तपासणी करण्यास नकार दिला होता. तपासणीसाठी आवश्‍यक सुविधा नसल्याचे कारण यासाठी देण्यात आले होते. मात्र ही बाब लोकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने ‘एनजीटी’ने यासंदर्भातील वृत्ताची दखल घेतली असून यावर सुनावणी सुरू केली आहे. मोटारीतील आसनातील फोम आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांमध्ये या रसायनाचा वापर होतो. हे रसायन दीर्घकाळ मोटारीत राहिल्याने चालक आणि विशेषतः त्यातून प्रवास करणाऱ्या लहान मुलांना कर्करोग होण्याचा धोका उद्गभवू शकतो, अशी माहिती ‘एनजीटी’ला मिळाली आहे.

याप्रकरणी ‘सीपीसीबी’ने नुकताच एक अहवाल ‘एनजीटी’कडे दिला आहे. ‘टीसीआयपीपी’, ‘टीडीसीआयपीपी’ आणि ‘टीसीआयपी’ या रसायनांमुळे कर्करोग होतो किंवा नाही, याच्या तपासासाठी ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’कडे (आयसीएमआर) सर्व साधने आहेत,असे ‘सीपीसीबी’ने त्‍यात नमूद केले होते.

‘आठ आठवड्यांत उत्तर द्या’

या प्रकरणी आठ आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश ‘एनजीटी’ने सर्व विभागांना दिले आहेत. ‘सीपीसीबी’ व ‘आयसीएमआर’सह केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव, ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’चे मुख्य प्रशासकीय अधिकारी, ‘नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग अँड आर अँड डी इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स’चे मुख्य प्रशासकीय अधिकारी व भारतीय मानक संस्थेचे महासंचालक या सर्वांना पुढील सुनावणीआधी उत्तर देण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT