Car Buying Tips : तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर त्याची आत्तापासूनच तयारी करा. तसेच यावेळी तुमच्या डोक्यात काही प्रश्न असले पाहिजेत. तुम्ही नवीन कार खरेदी करत असाल अथवा जुनी त्याने फरक पडत नाही. तुम्ही ज्याच्याकडून कार खरेदी करताय त्याला काही प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत. आम्ही तुम्हाला असं सांगतोय कारण डील पूर्ण झाल्यानंतर भविष्यात तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये.
तुम्ही येणाऱ्या काळात एखादी नवीन किंवा जुनी कार खरेदी करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण यात आम्ही तुम्हाला कार खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे हे पाहुया.
कॅलिफोर्नियातील बेकर्सफील्ड ह्युंदाई येथील डीलर प्रिन्सिपल पॅट्रिक बेक यांच्या मते, गेल्या काही वर्षांपासून कार खरेदी विक्री क्षेत्रात मंदी आहे. पण, नवनव्या गाड्या सामान्य जनतेच्या बजेटमध्ये येतात. त्यामुळे इथून पुढच्या काळात यासाठी चांगले दिवस येतील. आता कॅलिफोर्नियामधील डीलर्स नेहमीपेक्षा अधिक करार करण्यास तयार आहेत.
पहिला प्रश्न
तुमच्याकडे अशी कार आहे का जी माझ्या गरजा पूर्ण करेल? डीलरशिप तुमच्या गरजा आणि बजेटनुसार सर्वात उत्तम कारची तुम्हाला माहिती देईल.
कारची दुरूस्ती
कारच्या भविष्यातील दुरुस्तीसाठीच्या योजना काय-काय आहेत? या प्रश्नामुळे तुम्हाला कळेल की कार काही वर्षांनी बिघडली किंवा एखादा पार्ट खराब झाला तर त्यावेळी कंपनी तुमच्या किती कामी येईल?
वित्त पुरवठा
गाडी घेण्याआधी बाजारातील गाड्यांच्या किंमतींचा रिसर्च करा. कारण रिसर्च करणं नेहमीच महत्त्वाचे असते. रिसर्चमुळे मार्केटमध्ये गाडीची काय किंमत आहे आणि डिलर आपल्याला काय देतोय हे कळते. त्यामुळे रिसर्चनंतरच गाडी फायनल करा
वॉरंटी
कारवरील वॉरंटी कधीपर्यंत आहे?, डिलरकडून या गोष्टीची माहिती घ्या. यावरून तुम्हाला कळेल की कंपनीला त्यांच्या स्वतःच्या कारवर किती विश्वास आहे. वॉरंटी कव्हर काय आहे? त्याबद्दल त्याला विचारा.
शुल्क
या कारवर कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क आकारलं जातं का? कार खरेदी करताना डीलर तुम्हाला या अतिरिक्त शुल्काबद्दल माहिती देणाार नाही, परंतु तुमची डील पूर्ण होत आल्यानंतर इतर चार्जेसच्या नावाखाली तुमची लूट होऊ शकते.
इतर सेवा
वाहनासह कंपनी इतर काही सुविधा देते का? तुमच्या डीलरला विचारा की या कारवर कंपनी किंवा तुम्ही स्वतः काही सुविधा देता का? कारण या गोष्टी नंतर तुमच्या कारची किंमत वाढवतात.
निर्णय घेणं
मी माझा निर्णय घेईपर्यंत तुम्ही थाबू शकता का? असं तुम्ही डिलरला विचारू शकता. कार खरेदी करणं एक मोठी गुंतवणूक आहे परंतु हा एक सोपा निर्णय नसतो. त्यामुळे तुमचं फायनल होईपर्यंत डिलर थांबू शकतो का हे त्याला विचारा.
कागजपत्रे तपासा
वाहनाची डिलीव्हरी देताना कोणती कागदपत्र आणि वस्तू तुम्ही मला देणार? डीलर यावर जे काही सांगेल किंवा दावा करेल ते सर्व तुम्ही त्याच्याकडून लेखी घ्या. जेणेकरून तो नंतर कोणतीही वस्तू द्यायला नकार देणार नाही.
बाजारातील किंमत
गाडी खरेदी करताना मार्केटमध्ये त्याची जास्त किंमत असेल तर गाडी घेऊ नका. काही दिवस हा निर्णय पुढे ढकलल्याने तिच गाडी तुम्हाला अजून कमी किमतीत मिळू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.