car buying tips these 5 cng suv and electric car to be launch in november 2022  
विज्ञान-तंत्र

Car Buying Tips: पुढच्या महिन्यात लॉंच होतायत CNG, SUV अन् इलेक्ट्रिकसह 'या' ५ गाड्या

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही पुढच्या महिन्यापर्यंत कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये पाच बेस्ट कार भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. या पाच वाहनांमध्ये एक इलेक्ट्रिक, एक सीएनजी आणि तीन पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या कारचा समावेश आहे. ही वाहने अनेक प्रगत फीचर्स आणि त्यांची डिझाईन आणि लूकमुळे शेकडो ग्राहकांना आकर्षित करतील, चला तर मग त्यांच्याबद्दल काही तपशील जाणून घेऊया.

New Generation MG Hector

या यादीतील पहिला क्रमांक एमजी हेक्टरचा आहे, जी पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये आपल्या नवीन जनरेशनसह बाजारात प्रवेश करेल. एमजीची ही सर्वाधिक मागणी असलेली एसयूव्ही अनेक प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल.ही एसयूव्ही लॉन्च झाल्यानंतर कंपनीच्या वाढीस मदत करेल अशी अपेक्षा आहे.

Jeep Grand Cherokee

या यादीत दुसरे नाव आहे जीप ग्रँड Cherokee चे. Jeep Grand Cherokee पुढील महिन्यात प्रीमियम सेगमेंटमध्ये बाजारात आणली जाईल. ही जीप कार प्रीमियम सेगमेंटमध्ये धमाका करू शकते, कारण तिच्या इंजिन आणि फीचर्समध्ये बरेच अपग्रेडेशन करण्यात आले आहेत.

BYD Atto 3

या यादीत तिसरे नाव चीनी निर्माता BYD चे आहे, जी लवकरच आपली इलेक्ट्रॉनिक SUV लॉन्च करणार आहे. कंपनीने नुकतेच त्याचे अनावरण केले. Atto 3 ही चिनी कंपनीची पहिली इलेक्ट्रिक SUV असेल. कंपनी पुढील महिन्यात लॉन्च करू शकते. ही कार एक दमदार रेंज आणि अनेक उत्कृष्ट फीचर्ससह बाजारात दाखल होईल.

Toyota Innova Hycross

या यादीतील चौथे नाव टोयोटा इनोव्हा हाय क्रॉस हे आहे, जी अलीकडे अनेक ठिकाणी स्पॉट झाली आहे. हे वाहन पुढील महिन्यात भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. इनोव्हा क्रिस्टा प्रमाणे हे वाहन देखील बाजारात मजबूत पकड निर्माण करू शकते.

Maruti Baleno 2022 Cng

या यादीतील शेवटचे आणि पाचवे नाव मारुती सुझुकीच्या बलेनोचे आहे, जी कंपनी सीएनजी प्रकारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या कारवर कंपनीची पकड आधीच बाजारात आहे. सीएनजी मॉडेलवरही ग्राहक प्रेमाचा वर्षाव करतील अशी अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT