Car Care Tips : पंपावर गेल्यावर आधीच पेट्रोलचे दर बघून तुमची सटकलेली असते. त्यात गर्दीतून वाट काढत तूम्ही कार पेट्रोलच्या मशीनसमोर घेता. उन्हामुळं गाडीत बसूनच तूम्ही हजारचं पेट्रोल भर रे, म्हणून तिथल्या पोराला सांगता. नेमकं त्याचवेळी पलिकडील बाजूच्या गाडीतून आवाज येतो की, डिझेल भरा, त्यात तो कर्मचारी गोंधळून जातो आणि तुमच्या कारमध्ये डिझेल भरतो.
त्याच डिझेल भरून झाल्यावर तूम्ही सहज मशीनच्या काट्याकडे पाहता. तेव्हा तुम्ही एकदम चिडून त्या पोराला ओरडता, तुला पेट्रोल भरायला सांगितलं होतं. तू डिझेल का भरलं. तो बिचारा भेदरतो, आणि चुकून झालं साहेब, माफ करा अशी विनवणी करतो.
तुम्ही त्याच्यावर चिडचिड करून काही होणार आहे का ? नाही ना. मग कशाला चिडचिड करता. शांत व्हा. आणि अशा प्रसंगी काय करायचं हे पहा.
पेट्रोल कारमध्ये डिझेल टाकल्याने डिझेल कारमध्ये पेट्रोल टाकण्याएवढे नुकसान होत नाही. कारण डिझेल स्नेहन तेलाचे काम करते, त्यामुळे इंधन पंप आणि इंजिनला जोडलेले इतर भाग व्यवस्थित काम करतात. डिझेलच्या टाकीत पेट्रोल टाकले तर गाडी सुरू होताच ते इंजिनच्या प्रत्येक भागात पोहोचते. डिझेलमध्ये मिसळल्यावर पेट्रोल सॉल्व्हेंट म्हणून काम करू लागते. त्यामुळे वाहनाच्या पार्ट्समधील घर्षण वाढते. इंधन लाइनसह पंप खराब होऊ शकतो. यासोबतच इंजिनचेही मोठे नुकसान होऊ शकते.
पेट्रोल पंपावर तेल टाकणाऱ्या व्यक्तीला तुमच्या गाडीत पेट्रोल टाकायचे की डिझेल हे स्पष्टपणे सांगा.
वाहनाच्या तेलाच्या टाकीच्या झाकणावर नेहमी पेट्रोल किंवा डिझेलचे स्टिकर लावा.
• चुकीचे इंधन टाकल्यास इंजिन सुरू करू नका.
• कार धक्का मारून साइडला करा .
• मेकॅनिकच्या मदतीने, इंधन टाकीतील इंधन बदलून घ्या आणि मिश्रित इंधन काढून टाका.
• नवीन पेट्रोल टाकल्यावरच गाडी सुरू करा.
गाडी सुरू केल्यानंतर लक्षात आले तर...
गाडीत डिझेल भरलं आहे, हे काही वेळानंतर लक्षात आलं तर, गाडी साईडला घेऊन बंद करा. गाडी सुरू ठेऊन मेकॅनिकला फोन केल्यास तुमचे हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते. तातडीने गाडी बंद करा आणि बाजूला घ्या.
पेट्रोलची टाकी पूर्णपणे स्वच्छ करा.
सर्व पेट्रोलमध्ये गेलेले डिझेल मिसळून वाहनातून बाहेर काढा. टाकी पूर्णपणे स्वच्छ करा. जर तुम्ही वाहन सुरू केले नाही, तर टाकीमधून इंधन काढून टाका. गाडीच्या इंजिनकडे जाणाऱ्या पाईपमधून डिझेल काढणे.
केवळ इंजिनमधील स्वच्छता करणं एवढेच काम नाही. तर, इंजिनमध्ये गेलेले सर्व तेल बाहेर काढावे लागते. गाडीच्या ज्या पार्टमध्ये डिझेल असेल ते खराब झाले नाहीत ना हे तपासावे लागते.
पेट्रोलच्या जागी डिझेल पडलं तर ..
चुकून डिझेल वाहनात पेट्रोल टाकले तर तुम्ही दोन गोष्टी ताबडतोब केल्या तर तुमच्या वाहनाचे कोणतेही नुकसान होणार नाही. एक म्हणजे, वाहन सुरू करू नका. तुम्ही वाहन सुरू केल्यास डिझेलमध्ये मिसळलेले पेट्रोल लगेचच इंजिनापर्यंत पोहोचते. हे होणे अत्यंत धोकादायक आहे. असे करणे धोकादायक आहे, यामुळे वाहनाचे अनेक भाग खराब होतील. आधी गाडी ढकलतच बाजूला घ्या आणि मेकॅनिकला बोलवा.
महत्त्वाचे मुद्दे
• जेव्हा पेट्रोल डिझेल कारमध्ये प्रवेश करते, तेव्हा मशीनच्या भागांमधील घर्षण वाढते आणि यामुळे पंप इंधन लाईनसह निकामी होऊ शकतो.
• असे असूनही, तुम्ही इंजिन चालू ठेवल्यास किंवा कार चालविल्यास, इंजिन खराब होऊ शकते किंवा इंजिन सीज होऊ शकते.
• जर तुम्हाला आधीच कळले असेल तर, कार अजिबात सुरू करू नका आणि ताबडतोब मेकॅनिककडे नेण्याची व्यवस्था करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.