How to Charge Laptop in Car : कित्येक वेळा आपण प्रवास करत असताना अचानक काही काम समोर येतं, अशा वेळी कारमध्येच लॅपटॉप चार्ज करण्याची गरज भासू शकते. मात्र, कारमध्ये तर लॅपटॉप चार्ज करण्यासाठी सोयच उपलब्ध नसते! अशा वेळी कारच्या फोन चार्ज करण्याच्या सॉकेटमधूनच तुम्ही लॅपटॉपही चार्ज करू शकता. अर्थात, यासाठी तुम्हाला खास गॅजेट वापरण्याची गरज भासणार आहे.
कारमध्ये लॅपटॉप चार्ज करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक वेगळा कार चार्जर खरेदी करावा लागेल. साधारणपणे कार चार्जरमध्ये एकच यूएसबी पोर्ट दिलेला असतो. यामध्ये यूएसपी टाईप ए पिन बसवण्यासाठी जागा असते. या माध्यमातून स्मार्टफोन चार्ज करता येतो. मात्र, आम्ही तुम्हाला जी गॅजेट्स (Car Laptop Charger) सांगणार आहोत, त्यांच्या मदतीने तुम्ही लॅपटॉपही चार्ज करू शकाल.
गाडीमध्ये लॅपटॉप चार्ज करण्यासाठी Vantro Car Power Inverter 200W हा एक चांगला पर्याय आहे. तुमच्या कारच्या सिगारेट लायटर सॉकेटमध्ये याचा प्लग कनेक्ट करून तुम्ही याचा वापर करू शकता. यामध्ये दोन थ्री-पिन सॉकेट आणि चार यूएसबी सॉकेट देण्यात आले आहेत. यामुळे तुम्ही एकाच वेळी लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट असे सर्व डिव्हाईस चार्ज करू शकता.
यासोबतच या डिव्हाईसवर एक स्क्रीनही देण्यात आली आहे. यामध्ये सध्या पास होत असणारी पॉवर किती क्षमतेची आहे ते पाहता येतं. 200W पर्यंत क्षमतेचे डिव्हाईस याच्या मदतीने चार्ज करता येतात. Vantro कंपनीच्या वेबसाईटवर हे डिव्हाईस सध्या केवळ 1,999 रुपयांना उपलब्ध आहे.
बीएसटीईके या कंपनीचा 400W Power Inverter देखील एक चांगला पर्याय आहे. यामध्ये 400W पर्यंत क्षमतेचे डिव्हाईस चार्ज करता येऊ शकतात. यामध्ये देखील एलईडी स्क्रीन आणि इतर फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, कार थांबलेली असताना, थेट बॅटरीला कनेक्ट करूनही तुम्ही हा चार्जर वापरू शकता. यामध्ये दोन थ्री-पिन आणि दोन यूएसबी आऊटलेट देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.