Car Maintenance Tips : पावसाळ्याची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात. मात्र पावसाळा सोबत येताना बऱ्याच समस्याही घेऊन येतो. जसे की व्हायरल इनफेक्शन, घरात, घराच्या पार्किंगमध्ये पाणी साचणे.
पावसाळ्यात अनेकदा रस्त्याच्या कडेला किंवा तळघरात उभ्या केलेल्या वाहनांमध्ये पाणी साचते, त्यामुळे वाहनाच्या इंजिनपासून वायरिंगपर्यंत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तेव्हा कार मेन्टेननसच्या या काही सोप्या टिप्स लक्षात घ्या.
याआधी तुमच्याही गाडीत पाणी शिरून तुमचं नुकसान झालं असेल तर यावेळी गाडीत पाणी शिरल्यानंतर त्याच्या मेन्टेनन्ससाठी या काही सोप्या टिप्स लक्षात घ्या.
१) गाडीत पाणी शिरल्यानंतर गाडी लगेच सुरू करू नका
पूरात किंवा रस्त्यावरील पाण्याची पातळी वाढून तुमच्या वाहनात पाणी शिरले असेल, तर सर्वप्रथम वाहन सुरू करणे टाळावे, कारण असे केल्याने तुमच्या वाहनाचे सर्वाधिक नुकसान होऊ शकते. कार मॅन्युअली अनलॉक करा आणि सर्व दरवाजे उघडा.
जर कारमध्ये जास्त पाणी असेल तर ते काढून टाकावे आणि थोडी हवा कारच्या आतील भागात जाऊ द्या. कारमधील कोणतीही विद्युत यंत्रणा चालू करणे टाळा. तसेच, कार पूर्णपणे कोरडी होऊ द्या आणि आवश्यक असल्यास कार लवकर कोरडी करण्यासाठी पोर्टेबल फॅन वापरा.
कारमधील इलेक्ट्रिक यंत्रणेचे कोणतेही नुकसान झाले नाही हे एकदा सुनिश्चित झाले की पुढचे पाऊल म्हणजे लिक्विड बदलणे. इंजिन ऑइल, गिअरबॉक्स ऑइल, डिफरेंशियल ऑइल, पॉवर स्टीयरिंग फ्लुइड आणि क्लच फ्लुइड काढून टाका. कूलंट देखील बदला, कारण दूषित पाणी चुकून सिस्टीममध्ये गेले नुकसान आणखी वाढेल. तेव्हा एअर फिल्टर देखील बदला. (Car)
फ्यूल टँक रिकामी करा
एकदा सर्व लिक्विड बदलल्यानंतर, पुढील पायरी म्हणजे फ्यूल टँक रिकामी करा, कारण त्यात पाणी शिरण्याची शक्यता असते. फ्यूल टँकमध्ये मिसळलेले पाणी सिलेंडर, फ्यूल इंजेक्टर/कार्ब्युरेटर आणि इतर कंपोनेंट्समध्ये समस्या निर्माण करू शकते. (Monsoon)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.