Car Maintenance Tips esakal
विज्ञान-तंत्र

Car Maintenance Tips : खर्च कमी अन् जास्त मायलेज;  या टिप्स फॉलो करा अन् कारचे आयुष्य वाढवा!

कार सुस्थितीत रहावी यासाठी तिची काळजी घेणंही गरजेचं!

Pooja Karande-Kadam

कार चालवण्यासाठी जसे त्यात पेट्रोल भरणे महत्त्वाचे आहे. तसेच, गाडीची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पण, प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. काही लोक तर केवळ गाडी पळवण्यासाठी खरेदी करतात. तिची काळजी घेणं दूर दूर पर्यंत शक्य नसतं.  

गाडीचे वरून दिसणारे पार्ट लवकर खराब होतात. खराब झालेले पटकन लक्षात येतात. पण, गाडीतील इंजिन, त्याचे पार्ट खराब झालेले लक्षात येत नाहीत. त्यामूळे अचानक गाडी बंद पडते आणि आपण संकटात सापडतो.

वेळीच गाडीची काळजी घेतली. तर गाडीचा परफॉर्मन्सही सुधारतो आणि गाडीचे आयुष्य वाढते. त्यामूळे गाडी सुरळीत सुरू राहण्यासाठी गाडीची काळजी कशी घ्यायची. याच्या काही टिप्स पाहुयात.

गाडीचे टायर्स

गाडीच्या टायर्सची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते. कारण, त्याची जास्त झीज होत असते. म्हणून कार मालकांनी टायरची स्थिती नियमितपणे तपासली पाहिजे. कार मालक टायर बदलण्याची योग्य वेळ ओळखू शकतो जसे की जीर्ण झालेले ट्रेड आणि रबरमधील क्रॅक यासारख्या चिन्हे शोधून.

टायर्सनी ऐन टायमाला दगा देऊ नये म्हणून कार मालकांनी नियमित टायरचा हवेचा दाब तपासला पाहिजे. चुकीच्या हवेच्या दाबामुळे इंधनाची कार्यक्षमता कमी होते आणि टायर फुटण्याची शक्यता वाढते.

इंजिनची काळजी

इंजिन ऑइल, कूलंट, ब्रेक ऑईल, पॉवर स्टीयरिंग ऑईल आणि ट्रान्समिशन ऑईल यासारख्या ऑईलची नियमितपणे तपासणी करणे ही महत्त्वाची टीप आहे. सर्व पॅनेलवर ब्रेक ऑइलचे चिन्ह दिसते. रिफिलची आवश्यकता दर्शवते. ऑईलची पातळी कमी झाल्यास, कार जास्त तापू शकते. काम करणे थांबवू शकते.

कारने चांगला परफॉर्मन्स द्यावा यासाठी गाडीची ऑईल बदली करणे आवश्यक आहे. कारमधून ऑईल गळती होत असेल तर त्याचीही तपासणी करणे गरजेचे आहे.

गाडीची स्वच्छता महत्त्वाची

कारची बॅटरी

बॅटरी वाहनातील सर्व इलेक्ट्रिकल सिस्टमला पॉवर सप्लाय देते. म्हणून कारची बॅटरी तपासणे महत्त्वाचे आहे. कारण या घटकातील किरकोळ समस्यांमुळे वायर जळून जाणे आणि इतर महत्त्वाच्या समस्या उद्भवू शकतात. नवी बॅटरी बसवताना ती योग्य असावी, कंपनीचीच असावी याकडे लक्ष द्या.

कारच्या बॅटरीला दर चार ते पाच वर्षांनी बदलण्याची आवश्यकता असते. त्यामुळे बॅटरीने त्या वयाच्या श्रेणीमध्ये प्रवेश केला असेल, तर तुम्ही ती बदलणे आवश्यक आहे.

कारचे गिअर

गाडी चालवताना कार चालकाला गीअर सहज बदलायला यायला हवे. जर ते जाम असतील तर गाडी चालवणे सोपे होणार नाही. आणि आपघाताला आमंत्रण मिळते. अचानक गीअर बदलल्याने क्लच आणि गीअर्स खराब होऊ शकतात. त्यामुळे, कार मालकांनी गीअर बदलल्यानंतर लगेचच क्लच पेडलवर पाय ठेवू नयेत. कारण ते कालांतराने क्लच प्लेटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकते.

कार चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी कार स्वच्छ करणे ही एक मूलभूत गोष्ट आहे. कार मालकांनी आतून व्हॅक्यूम करणे आणि बाहेरून स्वच्छ करणे आवश्यक आहे. कारचा रंग टिकवा म्हणून वर्षातून दोन किंवा तीनदा त्यांचे कार पॉलिश करावी.

डॅशबोर्डवरील सुचना

डॅशबोर्डवर आलेल्या सुचक चिन्हांवर लक्ष ठेवल्याने तुम्हाला अपूरणीय किंवा महाग दुरुस्ती टाळण्यात मदत होऊ शकते. वाहन डॅशबोर्ड ब्रेक ऑइल, ऑइल प्रेशर लाइट, टायर प्रेशर लाइट, अँटी-लॉक ब्रेक वॉर्निंग लाइट, इंजिन तापमान लाइट, ट्रॅक्शन कंट्रोल खराब होणे, बॅटरी अलर्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, कमी इंधन इत्यादींसंबंधी विविध सुचना देऊ शकतो.

कारचे लाईट्स तपासणे

कारच्या देखभालीच्या महत्त्वाच्या टिपांपैकी एक म्हणजे कारचे लाईट्स तपासणे गरजेचे आहे. अपघाताने तुटलेले लाईट्स वेळीच दुरूस्त करावे. कारण, त्यामूळे  विशेषत: रात्री आणि रात्रीच्या वेळी वाहन चालवताना अपघाताची शक्यता वाढवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT