Car Offer eSakal
विज्ञान-तंत्र

Car Offer : एक रुपयाही न भरता मिळेल ही हॅचबॅक कार; दहा हजारांपेक्षा कमी बसेल हप्ता! जाणून घ्या डीटेल्स

Best Offer on Car : स्वतःची चारचाकी गाडी दारात असावी हे बहुतांश लोकांचं स्वप्न असतं.

Sudesh

स्वतःची चारचाकी गाडी दारात असावी हे बहुतांश लोकांचं स्वप्न असतं. मात्र त्यासाठी पैशाची जुळवाजुळव करणं हे तेवढंच अवघड काम असतं. तुम्हीदेखील केवळ बजेट नाही म्हणून आपली कार घेण्याची इच्छा दाबून ठेवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा कारबाबत माहिती देणार आहोत, जी घेण्यासाठी बँका पूर्ण कर्ज द्यायला तयार आहेत. झीरो डाऊनपेमेंटमध्ये - म्हणजेच एक रुपयाही खर्च न करता तुम्ही ही कार विकत घेऊ शकता. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे, याचं मायलेज अगदी तगडं आहे आणि मेन्टेनन्सही अगदी कमी आहे.

कोणती आहे कार?

आम्ही ज्या कारबद्दल सांगत आहोत, ती कार मारुती-सुझुकीची 'बलेनो' आहे. कमी किंमतीत चांगले फीचर्स आणि उत्तम मायलेज यासाठी ही कार प्रसिद्ध आहे. या कारमध्ये 1.2 लीटरचं पेट्रोल इंजिन मिळतं. सोबतच, ही कार सीएनजी पर्यायातही उपलब्ध आहे. या कारचं इंजिन अगदी सायलेंट आहे.

दमदार मायलेज

या कारचं पेट्रोल व्हेरियंट हे 22 किलोमीटर प्रति लीटर एवढं मायलेज देतं. तर, सीएनजी व्हेरियंटमध्ये तब्बल 34 किलोमीटर प्रति किलो एवढं मायलेज मिळत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

किती आहे किंमत?

या कारचे पेट्रोलमध्ये 9 व्हेरियंट आहेत. बेस व्हेरियंटची किंमत 6.61 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. तर, टॉप व्हेरियंटची किंमत 9.88 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. बलेनोच्या सीएनजीचं एकच व्हेरियंट उपलब्ध आहे, ज्याची किंमत 8.35 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.

झीरो डाऊनपेमेंट

कित्येक राष्ट्रीय बँका बलेनो गाडीसाठी झीरो डाऊनपेमेंट लोन ऑफर करतात. म्हणजेच, याच्या बेस मॉडेलवर कंपनी देखील सुमारे 65 हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. म्हणजेच, 6.61 ऐवजी ही कार 5.96 लाख रुपयांनाच उपलब्ध होऊ शकते. यावर 7 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने कर्ज घेतल्यास, EMI म्हणून दरमहा 9,589 रुपये एवढा पडेल. तसेच व्याज म्हणून तुम्हाला मूळ रकमेपेक्षा अधिकचे 2,09,484 रुपये द्यावे लागतील.

काय मिळतील फीचर्स?

या कारमध्ये 2 एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, चाईल्ड लॉक, आयसोफिक्स सीट्स, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल, रिअर पार्किंग सेन्सर, मोठी इन्फोटेन्मेंट स्क्रीन, मागच्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तींसाठी रिअर एसी व्हेंट्स, क्लायमेट कंट्रोल एसी आणि इतर कित्येक फीचर्स मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT