Car Selling Tips esakal
विज्ञान-तंत्र

Car Selling Tips : कार विकण्याचा विचार करताय? कशी मिळवाल Best Resale Price

तरच तुम्हाला हव्या त्या किंमतीत गाडीची विक्री देईल

Pooja Karande-Kadam

Car Selling Tips : जेव्हा एखादी वस्तू तुम्ही खरेदी करायला जाता. तेव्हा ती वस्तू छान प्रेझेंटेबल असेल तरच तूम्ही खरेदी करता. पण, जर वस्तू अस्वच्छ, धुळीने माखलेली असेल तर तिच्याकडे  कोणीही पाहत नाही. तोच नियम तुम्ही कार विकत असताना लागू पडतो. गाडी विकताना काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे.

गाडी खरेदी करण्यासाठी लोक येतात.पण, गाडीला बघून कळवतो असे म्हणून ते निघून जातात. बरं जरी त्यांनी गाडी फायनल केली. तरी तुम्हाला हव्या असलेल्या किंमतीत ते कार घ्यायला तयार होत नाहीत.

गाडी चांगल्या किंमतीला विकणं ही एक कला असते. त्यामुळेच तर एजंट लोकांमध्येही यात चढाओढ पहायला मिळते. पण, एजंटकडे न जाता तुम्हाला स्वत:च गाडी विकणार असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या.  

कारची किंमत ठरवा

जर तुम्ही कार विकण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तिची नवीन किंमत किती आहे ते बघा. नंतर, त्या मॉडलचे बाजारात सध्याचे दर काय आहेत ते शोधा. तुमची गाडीची किंमत ठरवण्यासाठी कार विक्रीसाठीच्या वेबसाईट तपासा. ते तुम्हाला योग्य किंमत सांगू शकतात.

गाडीची अवस्था

गाडी योग्य अवस्थेत आहे हे तपासा. गाडी जेव्हा तुम्ही दुसऱ्याला विकत असता तेव्हा तिचे पार्ट तुटलेत का तपासा. गाडीचे बाहेरील पार्ट तुटलेले असतील तर त्याचे बॅड इंप्रेशन पडतं. त्यामुळं आधी त्या पार्ट्सची दुरूस्ती करून घ्या.

कारची सर्व्हिसिंग

तुम्हाला कार विकायची असेल तर त्याआधी कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्रात जाऊन कारची सर्विस करून घ्या. गाडीचे आतील पार्ट सुरळीत काम करत आहेत का? नसेल तर सर्व्हिसिंग केल्याने फायदा होतो. जेव्हा ग्राहक कारची टेस्ट ड्राइव्ह घेतो तेव्हा त्याला कोणतीही कमतरता सुद्धा दिसणार नाही.

कारचे इंटीरियर

कारमधील वस्तू तुटलेल्या, फाटलेल्या किंवा फाटलेल्या नसाव्यात. ही छोटी गोष्ट वाटत असली तरी खरेदीदारासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. सीट आणि तळाची चटई पूर्ण स्वच्छ करा. तसेच कारमध्ये नेहमी एअर फ्रेशनर ठेवा.

कागदपत्रे 

आता सर्व तयारी झाल्यानंतर, तुम्हाला कार कुठे विकायची आहे ते ठरवा. आजकाल सेकंड हँड कार विकण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. तुम्ही तुमची कार थेट खरेदीदाराद्वारे, कार डीलरद्वारे किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे विकू शकता.

कारचे बाह्य रूप

गाडीचे पहिले इंप्रेशन हे तिचा रंग आणि लुकवरून पडतं. त्यामुळं कारवर पडलेले स्क्रॅचेस, अपघातावेळी गाडीचा घासलेली, चेपलेली बॉडी व्यवस्थित करून घ्या. त्यामूळे गाडीला चांगली किंमत मिळू शकते.  

कारचे इंटीरियर

कारमधील वस्तू तुटलेल्या, फाटलेल्या किंवा फाटलेल्या नसाव्यात. ही छोटी गोष्ट वाटत असली तरी खरेदीदारासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. सीट आणि तळाची चटई पूर्ण स्वच्छ करा. तसेच कारमध्ये नेहमी एअर फ्रेशनर ठेवा.

कार कुठे विकाल

आता सर्व तयारी झाल्यानंतर, तुम्हाला कार कुठे विकायची आहे ते ठरवा. आजकाल सेकंड हँड कार विकण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. तुम्ही तुमची कार थेट खरेदीदाराद्वारे, कार डीलरद्वारे किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे विकू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT