Monsoon Safe Driving Tips by Mumbai Police esakal
विज्ञान-तंत्र

Mumbai Police Car Tips : पावसाळ्यात कारची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या मुंबई पोलिसांनी दिलेल्या 'स्पेशल सेफ्टी' टिप्स

Saisimran Ghashi

Car Driving in Monsoon : पावसाळा हा आनंददायी आणि आल्हाददायक ऋतू आहे. पण खरं म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक समस्या देखील निर्माण होऊ लागतात. त्यामध्ये अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान, पुराचा धोका, आजार पसरणे आणि बऱ्याच समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते.

अशात एक महत्त्वपूर्ण समस्या असते ती पावसाळ्यात वाहन चालवण्याची. पावसाळ्यामध्ये वाहन चालवणे मग ते दुचाकी असो किंवा चार चाकी खूपच अवघड होऊन जाते. जर जास्त पाऊस असेल तर अत्यंत काळजीपूर्वक वाहन चालवावे लागते. जर योग्य ती काळजी घेतली नाही तर नक्की अपघात होण्याचा धोका असतो.

त्यामुळे पावसाळा आला रे आला की ड्रायव्हिंगसाठीच्या वेगवेगळ्या गोष्टी समजून घेणे आणि नियम पाळणे तसेच पावसाळ्यात ड्रायव्हिंगचेच्या टिप्स जाणून घेणे गरजेचे असते. अशात मुंबई पोलीस दलाकडून पावसाळ्यामध्ये वाहन चालवण्यासंबंधी काही टिप्स सांगण्यात आले आहेत.

मुंबई पोलीस या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट करत 'ड्राईव्ह विथ जॉय,नॉट फियर' असे म्हणत पावसाळ्यात वाहन चालवण्यासंबंधीच्या सुरक्षित राहण्याबाबतच्या टिप्स शेअर करण्यात आल्या आहेत. तर चला जाणून घेऊया मुंबई पोलीस दलाने सर्वांसाठी वाहन चालवण्यासंबंधी पावसाळ्यातल्या बेस्ट टिप्स काय आहेत.

कार ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. ती सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत राखणे आवश्यक आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

हॉर्नची तपासणी: आपत्कालीन परिस्थितीत हॉर्न काम करत असल्याची खात्री करा.

कारची हवा व्यवस्था: कारच्या हवा व्यवस्थेची स्वच्छता आणि कार्यक्षमता तपासा.

पार्किंगची जागा: झाडांच्या सावलीत कार पार्क करू नका. झाडाची फांदी पडण्याचा धोका असतो.

एअर फिल्टर: कारच्या एअर फिल्टरची नियमित तपासणी करा आणि गरजेनुसार बदलून घ्या.

वाइपर ब्लेड्स: वाइपर ब्लेड्सची नियमित तपासणी करा आणि गरजेनुसार बदलून घ्या.

एग्झॉस्ट सिस्टम: कारच्या एग्झॉस्ट सिस्टमची कार्यक्षमता तपासून त्याची योग्य काळजी घ्या.

टायरचा दाब: टायरचा दाब नियमितपणे तपासून योग्य प्रमाणात ठेवा.

हेडलाइट्स: जोराच्या पावसात हेडलाइट्स वापरा. त्यामुळे दृश्यता चांगली होते.

सुरक्षित अंतर: इतर गाड्यांशी सुरक्षित अंतर राखा.

अचानक ब्रेक आणि गती वाढ: अचानक ब्रेक मारणे किंवा गती वाढवणे टाळा.

कारचे तळ: कारच्या तळाची योग्य काळजी घ्या. त्यामुळे कारला गंज लागणार नाही.

या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुमची कार पावसाळ्यात चांगल्या स्थितीत राहील आणि तुम्ही सुरक्षित प्रवास करू शकाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT