Cars With 6 Airbags esakal
विज्ञान-तंत्र

Cars With 6 Airbags : कमी किंमतीत मिळतील 6 Airbags, पाहा किंमत

सकाळ डिजिटल टीम

Cars With 6 Airbags : कार खरेदी करताना फक्त फीचर्स नव्हे तर सेफ्टी वर सुद्धा ध्यान द्यायला हवे. क्रॅश टेस्ट मध्ये कोणत्या गाडीला किती सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. याची माहिती असणे आवश्यक आहे. परंतु, तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की, मार्केटमध्ये कमी किंमतीत येणाऱ्या कोणकोणत्या गाड्या आहेत. ज्या ६ एअरबॅग्स सोबत येतात.

Hyundai Grand i10 NIOS

ह्युंदाईच्या या कारमध्ये तुम्हाला ६ एअरबॅग्सची सुविधा मिळते. परंतु, हे फीचर तुम्हाला या कारमधील ASTA व्हेरियंट मध्ये मिळते. या व्हेरियंटचे मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडल तुम्हाला ७ लाख ९५ हजार किंमतीत तर AMT मॉडल ८ लाख ५१ हजार रुपये किंमतीत येते. या दोन्ही किंमती एक्स शोरूम किंमती आहेत.

Maruti Suzuki Baleno

मारुतीची ही हॅचबॅक कार खूप पॉप्यूलर कार आहे. ही कार Sigma, Delta शिवाय, Zeta आणि Alpha चार व्हेरियंट्स मध्ये येते. परंतु, तुम्हाला जर या कारमध्ये ६ एअरबॅग्स ऑप्शन हवा असेल तर यासाठी तुम्हाला Zeta व्हेरियंट किंवा त्याच्यावरचे व्हेरियंट खरेदी करावे लागेल. Zeta पेट्रोल व्हेरियंटची किंमत ८ लाख ३८ हजार (एक्स शोरूम) पासून सुरू होते. तर अल्फा व्हेरियंट (पेट्रोल) व्हेरियंटची किंमत ९ लाख ३३ हजार (एक्स शोरूम) पासून सुरू होते. या कारची सुरुवातीची किंमत ६ लाख ६१ हजार (एक्स शोरूम) आहे.

Hyundai i20

ह्युंदाईची ही कार एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. ज्यात ६ एअरबॅग्स मिळते. परंतु, हे ऑप्शन फक्त ASTA (O) व्हेरियंट मध्ये पाहायला मिळते. Asta(O) व्हेरियंटची सुरुवातीची किंमत ९ लाख ७७ हजार ३०० रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होते.

Kia Carens

किआची ही कार खूपच भारी आहे. या टॉप सेलिंग MPV कारच्या प्रत्येक व्हेरियंट मध्ये ६ एअरबॅग्स मिळते. कंपनीने केवळ कोणत्याही व्हेरियंट मध्ये हे फीचर देताना प्रत्येक व्हेरियंटचा समावेश केला आहे. किआच्या या MPV ची किंमत १० लाख ४४ हजार ९०० रुपये (एक्स शोरूम) पासून १७ लाख ५४ हजार ९०० रुपये (एक्स शोरूम) पर्यंत जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT