Chandrayaan-3 Budget eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 Budget : 'चांद्रयान-२' पेक्षा स्वस्त आहे 'चांद्रयान-३' मोहीम; पाहा किती आला खर्च

१४ जुलै रोजी हे चांद्रयान अंतराळात झेप घेईल.

Sudesh

भारताची अवकाश संशोधन संस्था असलेल्या इस्रोची तिसरी चांद्र मोहीम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपली आहे. १४ जुलै रोजी हे चांद्रयान अंतराळात झेप घेईल. इस्रोच्या एलव्हीएम-३ या रॉकेटच्या मदतीने हे यान चंद्रावर पाठवण्यात येईल.

श्रीहरीकोटामध्ये असणाऱ्या सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लाँचपॅडवरून हे रॉकेट अवकाशात जाईल. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगसाठी भारत दुसऱ्यांदा प्रयत्न करणार आहे. चांद्रयान-२ या मोहिमेवेळी काही तांत्रिक अडचणींमुळे चंद्रावर लँडिंग शक्य झाले नव्हते. मात्र, यावेळी यात यश मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे.

भारताच्या अवकाश मोहिमा या कमी बजेटसाठी प्रसिद्ध आहेत. अंतराळाबाबत पृथ्वीवरच तयार करण्यात आलेल्या हॉलिवूडपटांचं जेवढं बजेट असतं, त्यापेक्षा कित्येक पटींनी कमी खर्चात भारताने खरोखरचे उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत. यापूर्वीच्या मोहिमांची ही परंपरा भारताने चांद्रयान-३ ला देखील कायम ठेवली आहे. (Chandrayaan-3 Budget)

चांद्रयान-३ चं बजेट किती?

चांद्रयान-३ या मोहिमेसाठीचं अंदाजित बजेट हे ६०० कोटी रुपये होतं. मात्र, यामध्ये थोडी वाढ होऊन, अंतिम बजेट ६१५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. मात्र, तरीही हे बजेट चांद्रयान-२ च्या तुलनेत अगदी कमी आहे. कारण, चांद्रयान-२ या मोहिमेचं बजेट सुमारे ९७८ कोटी रुपये होतं.

काय आहे कारण?

चांद्रयान-३ चा खर्च कमी असण्याचं मोठं कारण म्हणजे, यामध्ये ऑर्बिटरचा वापरच करण्यात आलेला नाही. ऑर्बिटर ऐवजी यामध्ये प्रोपल्शन मॉड्यूलचा वापर करण्यात आला आहे. ऑर्बिटरच्या तुलनेत हे बनवण्यासाठी कमी खर्चाची गरज असते. त्यामुळे या मोहिमेचं बजेट देखील कमी झालं आहे.

हॉलिवूडपटांपेक्षा कमी बजेट

स्पेसमधील प्रवास आणि दुसरे ग्रह दाखवणाऱ्या अव्हेंजर्स एंडगेम या हॉलिवूडपटाचं बजेट हे २,४४३ कोटी रुपये होतं. तर अवतार या चित्रपटाचं बजेट ३,२८२ कोटी रुपये होतं. या तुलनेत भारताच्या अवकाश मोहिमांचं बजेट अगदीच परवडणारं आहे.

इतर देशांशी तुलना

इतर देशांचा विचार करता, भारत अगदीच कमी खर्चात आपल्या अवकाश मोहिमा यशस्वी करत आहे. चीनच्या चांग-ई ४ मून मिशनचा खर्च ६९.३८ लाख कोटी रुपये होता. तर, अमेरिकेच्या आतापर्यंतच्या सर्व चांद्र मोहिमांचा खर्च ८२५ लाख कोटी रुपये आला आहे. दुसरीकडे, सोव्हिएत संघाने आपल्या चांद्र मोहिमांवर केलेला खर्चही सुमारे १६५ लाख कोटी रुपये एवढा आहे.

२२ ऑक्टोबर २००८ रोजी भारताने आपलं पहिलं चांद्रयान लाँच केलं होतं. चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी हा उपग्रह लाँच करण्यात आला होता. याचा खर्च सुमारे ३८६ कोटी रुपये होता. यानंतर २०१९ मध्ये इस्रोने दुसरं चांद्रयान अवकाशात लाँच केलं होतं. आता ही इस्रोची तिसरी चांद्रमोहीम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT