ISRO Moon Mission esakal
विज्ञान-तंत्र

वेलकम ना भिडू! 'चांद्रयान 2' ने 'चांद्रयान 3'चं केलं जोरदार स्वागत; 'इस्रो'चं ट्वीट Chandrayaan 3

संतोष कानडे

ISRO Moon Mission : भारताची चांद्रयान-3 ही मोहीम यशाचा एकेक टप्पा पार करीत आहे. येत्या 23 तारखेला सायंकाळी चांद्रयानचं चंद्रावर लँडिंग होईल. त्यापूर्वी चांद्रयान-2चा चांद्रयान-3 शी संपर्क झालेला आहे. इस्रोने यासंदर्भात एक ट्वीट करत माहिती दिली. 'वेलकम बडी' अशा आशायचां ट्वीट इस्रोने केलं आहे.

Chandrayaan-3 Photos 

काल इस्रोने एक पोस्ट करत 'चांद्रयान-3'च्या लँडिंगची तारीख अन् वेळ सांगितली आहे. दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी हे लँडिंग होईल. सध्या चांद्रयान-3 सुस्थितीत असून, लँडिंगसाठी विक्रम सज्ज असल्याचंही इस्रोने स्पष्ट केलं.

आज सकाळी इस्रोने एक ट्वीट करत चांद्रयान- 3 हे लँडिंगसाठी जागा शोधत असल्याचं म्हटलं होतं. चांद्रयान-3 लक्ष्याच्या जवळ पाहोचलेलं असून सध्या ते लँडिंगसाठी जागा शोधत आहे. योग्य जागेची निवड केल्यानतंर चांद्रयानचं लँडिंग होईल. लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेऱ्याच्या सहाय्याने चांद्रयान सध्या सुरक्षित जागा शोधत आहे. उतरताना दगड किंवा खोल खंदक नसावा अथवा इतर अडथळे बघूनच यान लँड करेल, अशी माहिती इस्रोने ट्वीट करुन दिली.

आता इस्रोने आणखी एक ट्वीट केलं असून पूर्वीच्या चांद्रयान-2 ने चांद्रयान-3 शी संपर्क साधल्याचं नमूद केलं आहे. 'वेलकम बडी' असं म्हणत इस्रोने ही माहिती शेअर केली. ''Ch-2 ऑर्बिटरने Ch-3 LMचे औपचारिक स्वागत केले. दोघांमध्ये दुतर्फा संवाद प्रस्थापित झाला.. MOX ला आता LM पर्यंत पोहोचण्यासाठी आणखी मार्ग आहेत.'' असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, काल चांद्रयान-3 पूर्वीच रशियाचं लूना-25 हे चंद्राच्या दक्षिण भागात लँड होणार होतं. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे लूना 25 चं लँडर चंद्रावर क्रॅश झालं. यामुळे रशियाचं स्वप्न भंगलं आहे. केवळ रशियासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी ही एक दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता भारताच्या मोहिमेवर लागून राहिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT