Chandrayaan-3 eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 Update : 'चांद्रयान-३'ने पृथ्वीभोवती पूर्ण केली एक फेरी; आता ४२ हजार किलोमीटरहून अधिक उंचीवर

चांद्रयान-३ सुस्थितीत असल्याचं इस्रोने स्पष्ट केलं आहे.

Sudesh

१४ जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण केलेल्या चांद्रयान-३ ने शनिवारी पृथ्वीभोवती आपली पहिली फेरी पूर्ण केली. यानंतर आता ते पुढच्या कक्षेत गेलं असून, ४२ हजार किलोमीटरहून अधिक उंचीवरील कक्षेत फिरत आहे. चांद्रयान-३ हे सुस्थितीत असल्याचं इस्रोने स्पष्ट केलं.

चांद्रयान-३ हे पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. पाच वेळा पृथ्वीभोवती ते फिरेल. प्रत्येक वेळी ते पुढच्या कक्षेत ढकलण्यात येईल. यानंतर सहाव्या फेरीवेळी ते थेट चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल. या फेरीमध्ये ते पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण क्षेत्रापासून बाहेर जाईल.

३१ जुलैपर्यंत चांद्रयान-३ हे पृथ्वीपासून सुमारे १ लाख किलोमीटर दूर पोहोचले असेल. यानंतर वैज्ञानिक त्याला चंद्रासाठी निश्चित केलेल्या सौरकक्षेमध्ये ढकलतील. या कक्षेत काही दिवस प्रवास केल्यानंतर ते चंद्राजवळ पोहोचेल. त्यानंतर पृथ्वीप्रमाणेच चंद्राभोवती देखील ते फेऱ्या मारेल. (ISRO Chandrayaan-3 Update)

चंद्राच्या जवळ नेण्यासाठी पृथ्वीप्रमाणेच, मात्र उलट प्रक्रिया राबवण्यात येईल. यावेळी एक-एक टप्प्यामध्ये चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने आतल्या बाजूला ढकलण्यात येईल. यासाठी प्रोपल्शन सिस्टीमची मदत घेण्यात येईल. १७ ऑगस्टच्या आसपास ही प्रोपल्शन सिस्टीम चांद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरपासून वेगळी होईल. यानंतर लँडर हे चंद्रापासून १०० किलोमीटरच्या कक्षेत आणले जाईल.

चांद्रयान-३ मध्ये बदल

चांद्रयान-२ हे लँडिंगच्या वेळीच अयशस्वी झाले होते. त्यातून धडा घेत चांद्रयान-३ मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. विक्रम लँडरला चंद्रावर उतरण्यासाठी मागच्या मोहिमेवेळी केवळ ५०० बाय ५०० मीटर जागा निश्चित करण्यात आली होती. ही जागा आता वाढवून सुमारे ४ बाय २.५ किलोमीटर एवढी ठेवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT