Chandrayaan 3 Moon Oxygen eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 : प्रज्ञान रोव्हरच्या नव्या शोधामुळे अमेरिकेचाही होणार फायदा; जाणून घ्या कसं?

Sudesh

ISRO Moon Mission : चांद्रयान-3 मधील प्रज्ञान रोव्हर हे सध्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ फिरत आहे. या रोव्हरने आतापर्यंत चंद्राच्या मातीचं तापमान, आणि त्याठिकाणी असलेल्या मिनरल्सचा शोध लावला आहे. यामध्ये ऑक्सिजनचा देखील समावेश आहे. या शोधामुळे भारतासह अमेरिकेचा देखील मोठा फायदा होणार आहे.

प्रज्ञान रोव्हरमधील LIBS उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावर अ‍ॅल्युमिनिअम, सल्फर, कॅल्शियम, लोह, क्रोमियम आणि टायटॅनियमची उपस्थिती दर्शवली आहे. यासोबतच, याठिकाणी मँगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजनची उपस्थितीही असल्याचं यात स्पष्ट झालं आहे.

रिमोट सेन्सिंग

यापूर्वी चांद्रयान-1, चांद्रयान-2 आणि नासाच्या काही ऑर्बिटर्सने चंद्राच्या पृष्ठभागाचं रिमोट सेन्सिंग केलं होतं. या मूलद्रव्यांचे अस्तित्व यामध्ये दिसून आलं होतं. मात्र, हा डेटा चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवरुन घेतला होता; असं वैज्ञानिक टी.व्ही. वेंकटेश्वरन यांनी स्पष्ट केलं. ते एएनआयशी बोलत होते. (ISRO Chandrayaan Mission)

प्रज्ञानचा डेटा महत्त्वाचा

ऑर्बिटरने घेतलेला डेटा बराच उंचीवरून स्कॅन केलेला असल्यामुळे, चंद्रावर उतरून त्याची पडताळणी करणं गरजेचं होतं. हेच काम सध्या प्रज्ञान रोव्हर करत आहे. ते आणखी काही दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ फेऱ्या मारुन शक्य तितका डेटा गोळा करेल.

असा होणार फायदा

प्रज्ञान रोव्हरमधून मिळालेला डेटा हा नक्कीच अधिक विश्वासार्ह असणार आहे. यापूर्वी इतर ऑर्बिटर्समधून गोळा केलेला डेटा आणि प्रज्ञानने मिळवलेला डेटा जर मॅच झाला. तर, आपण सर्व रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानावर अधिक विश्वास ठेऊ शकणार आहे; असं वेंकटेश्वरन म्हणाले.

यामुळेच चांद्रयान-1, चांद्रयान-2 आणि नासाच्या ऑर्बिटर्समधून मिळालेल्या डेटावरील विश्वास अधिक दृढ होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेला आणि चंद्राभोवती ज्यांचं ऑर्बिटर आहे, अशा सर्व देशांना फायदा होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT