Chandrayaan 3 Update  
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Update : चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचलं चांद्रयान-3; आता फक्त 1437 किलोमीटर बाकी

रोहित कणसे

Chandrayaan 3 Third Moon Orbit Maneuver : भारताची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम असलेल्या चांद्रयान-३ ने आज एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला आहे. इस्त्रोने चांद्रयान-३ ला चंद्राच्या तीसऱ्या कक्षेमध्ये पोहचवले आहे. आता चांद्रयान १७४ किमी x १४३७ किलोमीटर अंतराच्या लहानशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. चांद्रयान-२ निर्धारित टार्गेटच्या पुढे पोहचल्याची देखील शक्यता आहे. मात्र इस्त्रोने याला अद्याप दुजोरा दिलेला नाहीये.

इस्त्रोने ९ ऑगस्ट दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी चांद्रयान-३ च्या कक्षेमध्ये बदल केला. म्हणजेच चांद्रयान-३ च्या थ्रस्टर्सना ऑन करण्यात आले. ५ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहचले होते. तेव्हा चांद्रयानाने चंद्राचा पहिला फोटो देखील प्रसिद्ध केला होता.(Latest Marathi News)

तेव्हा चांद्रयान-३ चंद्रा भोवती १९०० किलोमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने १६४ X १८०७४ किमी लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते. ज्याला ६ ऑगस्ट २०२३ रोजी कमी करून १७० x ४३१३ किमी कक्षेत पोहचले होते. म्हणजेच चांद्रयान-३ ला दुसऱ्या कक्षेत पोहचवण्यात आलं होतं.

अजून किती प्रवास बाकी आहे ?

  • १४ ऑगस्ट २०२३ : पहाटे बारा ते १२.०४ पर्यंत चौथी कक्षा बदलली जाईल.

  • १६ ऑगस्ट २०२३ : सकाळी८.३८ ते ८.३९ दरम्यान, पाचवीच्या कक्षेत पोहचेल . म्हणजेच फक्त पाच मिनीटांसाठी त्याचे इंजिन ऑन केले जातील.

  • १७ ऑगस्ट २०२३ : चांद्रयान -३ चे प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. याच दिवशी दोन्ही मॉड्यूल चंद्राच्या सर्व बाजूनी १०० किमी x १०० किमी गोल कक्षेत पोहचेल.

  • १८ ऑगस्ट २०२३ : दुपारी पाऊणे चार वाजता लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग होईल. म्हणजेच त्याची उंची कमी केली जाईल.

  • २० ऑगस्ट २०२३ : चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूलचे रात्री पाऊणे दो वाजता डीऑर्बिटिंग होईल.

  • २३ ऑगस्ट २०२३ : लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ लँड करेल. सर्वकाही व्यवस्थित पार पडलं तर पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

ISRO च्या बेंगळुरू येथील सेंटर टेलिमेट्री, ट्रॅकिंग नेटवर्क (ISTRAC)चे मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX) च्या माध्यमातून चांद्रयान-३ वर लक्ष ठेवून आहेत. सध्या चांद्रयान-३ मधील सर्व उपकरणे योग्यरित्या काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT