Chandrayaan 3 Update Landing Date eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 : रशियाच्या आधी चंद्राजवळ पोहोचूनही 'चांद्रयान 3'ला लवकर लँडिंग का शक्य नाही? जाणून घ्या

ISRO Moon Mission : चांद्रयान-3 हे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरवण्याचा इस्रोचा मानस आहे.

Sudesh

Moon Mission : भारताचं 'चांद्रयान-3' आणि रशियाचं 'लूना 25' हे दोन्ही सध्या चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहेत. रशियाचं लूना हे एका शक्तिशाली रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आलं होतं. त्यामुळे उशीरा प्रक्षेपित होऊनही, अगदी कमी वेळेत ते चंद्रापर्यंत पोहोचलं आहे.

लूना 25 हे चांद्रयानाच्या नंतर प्रक्षेपित केल्यानंतरही अगोदर चंद्रावर उतरणार आहे. यामुळे चंद्राच्या दक्षिण भागात पहिल्यांदा उतरण्याचा रेकॉर्ड हा रशियाच्या नावावर होणार आहे. पण जर चांद्रयान हे आधीपासून चंद्राच्या कक्षेत उपस्थित आहे, तर 23 तारखेपूर्वी त्याचं लँडिंग का शक्य नाही?

इस्रोची काय योजना?

'चांद्रयान 3'चं लँडिंग 23 ऑगस्ट रोजी करण्याचा इस्रोचा मानस आहे. याला कारण म्हणजे याच दिवशी चंद्रावर दिवस सुरू होणार आहे. चंद्रावरती एक दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांएवढा असतो. म्हणजेच, 23 ऑगस्टपासून पुढील 14 दिवस चंद्रावर सातत्याने सूर्यप्रकाश राहील.

चांद्रयानामध्ये बहुतांश उपकरणं ही सौरउर्जेवर चालणारी आहेत. त्यामुळेच, दिवसाच्या प्रकाशात लँडिंग करणं गरजेचं आहे. चांद्रयान-3 हे चंद्रावर दोन आठवडे कार्यरत राहणार आहे. त्यामुळे ज्या दिवशी चंद्रावरचा दिवस सुरू होतो त्याच लँडिंग केल्यास चांद्रयान-३ मोहीम यशस्वी होऊ शकणार आहे.

रात्री लँडिंग का नाही शक्य?

चंद्रावर रात्रीच्या वेळी अतिशय थंड वातावरण असतं. त्याच चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग करणार आहे. याठिकाणी रात्रीच्या वेळी तापमान हे -100 डिग्री सेल्सिअस एवढं कमी होतं. या तापमानात कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिक उपकरणं काम करत नाहीत. त्यामुळेच, 23 तारखेला चंद्रावर दिवस उजाडण्यापूर्वी लँड करणे चांद्रयानाला शक्य नाही.

लँडिंग अयशस्वी झाल्यास काय?

23 ऑगस्टला चांद्रयान-3चं लँडिंग शक्य झाले नाही, तर 24 ऑगस्टला पुन्हा प्रयत्न करण्यात येईल. या दिवशीही हा प्रयत्न अयशस्वी झाल्यास, पुन्हा प्रयत्न करण्यासाठी संपूर्ण महिना वाट पाहावी लागेल. चंद्रावरील एक दिवस आणि एक रात्र पूर्ण झाल्यानंतर, पुन्हा पुढच्या महिन्यात जेव्हा दिवस उजाडेल, तेव्हा पुन्हा लँडिंगचा प्रयत्न करता येईल.

लूना 25 कसं करेल लँडिंग?

रशियाच्या 'लूना 25' ला लँडिंग करण्यासाठी सूर्यप्रकाश असण्याचं बंधन नाही. याला कारण म्हणजे, लूनामध्ये सोलार उपकरणांसोबतच एक जनरेटर देखील देण्यात आला आहे. हा रात्रीच्या वेळी उपकरणांना हीट प्रदान करून, त्यांना सुरू ठेवेल. शिवाय, लूना-25 हे चंद्रावर एक वर्षासाठी राहणार आहे. त्यामुळे ते कोणत्याही दिवशी लँड करू शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT