WhatsApp Companion mode  Esakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Companion Mode: आता एकाच वेळी ४ मोबाईलवरून चॅटिंग करणं शक्य

व्हॉटस्अपने अँड्रॉइड़ वापर करत्यांसाठी 'कम्पेनियन मोड' फिचर सुरू केलं आहे. त्यामुळे Whatsapp युजर्सना आता चार अँड्रॉइड डिव्हाइसवर Whatsapp मेसेजिंग अॅप वापरता येणार आहे

Kirti Wadkar

WhatsApp Companion mode: आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेलं व्हाॅट्सअॅप हे सध्या एक महत्वाचं मेसेंजिंग अॅप ठरलं आहे. यामुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीला संपर्क करणं सहज सोप आहे.

त्याचसोबत कामाच्या ठिकाणी देखील या अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. chat tool marathi news you can chat with your Whatsapp from four mobiles

अनेक लोक कामासाठी अलिकडे दोन मोबाईल फोनचा Mobile Phone वापर करता. मात्र या दोन्ही फोनवर एकाच नंबरवरील व्हाॅट्सअॅप वापरणं शक्य होत नाही. मात्र आता ही चिंता मिटणार आहे. कारण व्हाॅट्सअॅपने Whatsapp युजर्ससाठी नवं फिचर लॉन्च केलं आहे. 

व्हॉटस्अपने अँड्रॉइड़ वापर करत्यांसाठी 'कम्पेनियन मोड' फिचर सुरू केलं आहे. त्यामुळे Whatsapp युजर्सना आता चार अँड्रॉइड डिव्हाइसवर Whatsapp मेसेजिंग अॅप वापरचा येणार आहे. यापूर्वी युजर्सना केवळ एक अँड्रॉइड डिव्हाइस आणि एका डेस्कटॉपवर लॉगइन करण्याची परवानगी होती.

Whatsapp बीटा इंफो या वेबसाइटनुसार हे नवं फिचर व्हाट्सअप अँड्राइटच्या सर्व बीटा युजर्ससाठी लॉन्च करण्यात आलं आहे.  या फिचरमुळे युजर्सना वेगवेगळ्या डिव्हाइसवरून व्हाटस्अप ऍक्सेस करता येणार आहे.

सध्या हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला व्हाॅट्सअॅपचं बीटा वर्जन डाउनलोड करावं लागेल.मात्र हे फिचर डाउनलोड केल्यानंतर ते वापरण्यासाठी २४ तास थांबावं लागेल. 

हे देखिल वाचा-

दोन फोनवर कसं सिंक कराल व्हाॅट्सअॅप

- तुमच्या दुसऱ्या फोनमध्ये Whatsapp किंवा व्हाॅट्सअॅप बिझनेसचं बीटा वर्जन डाउनलोड करा.

- रजिस्टेशन स्क्रिनवर ओव्हरफ्लो मेन्यूवर क्लिक केल्यावर कनेक्ट A डिव्हाइस हा पर्याय तुम्हाला दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथं एक QR कोड दिसेल.

- यानंतर तुमच्या मेन डिव्हाइसमध्ये व्हाॅट्सअॅप ओपन करा. ड्रॉप डाउन मेन्यूवर क्लिक करा. इथं लिंक्ट डिव्हाइस या पर्यायामध्ये जा. त्यानंतर लिंक A डिव्हाइसवर क्लिक करा. 

- त्यानंतर व्हाॅट्सअॅ स्कॅनर ओपन  होईल.

- आता दुसऱ्या फोनवर आलेलं OQ कोड तुमच्या मेन डिव्हाइसवर आलेल्या स्कॅनरवरून स्कॅन करा. अशा प्रकारे दुसऱ्या फोनवर तुमचं व्हाॅट्सअॅप सुरु होईल. 

आता ज्या फोनवर तुम्ही व्हाॅट्सअॅप लॉगिन केलंय ते तुमचं प्रायमरी म्हणजेच प्राथमिक व्हाॅट्सअॅप असेल. तर ज्या दुसऱ्या फोन किंवा डिव्हाइसने तुम्ही व्हाॅट्सअॅपला कनेक्ट केलं असेल ते तुमचं सेकंडरी डिव्हाइस असेल.

प्रायमरी Whatsapp वर अॅपचे सर्व फिचर्स मिळतील तर सेकंडरी डिव्हाइसवर Whatsapp चे चॅट आणि मेसेजचे काही बेसिक फिचर्स उपलब्ध असतील.

व्हाॅट्सअॅपच्या माहितीनुसार एक युजर चार डिव्हाइसवर लॉगइन करू शकेल  आणि चारही डिव्हाइसमध्ये मेसेजेस एंड टी एंड एन्क्रिप्टेड मिळतील.

म्हणजेच मेसेज पाठवणारा आणि मेसेज रिसिव्ह करणारा याव्यतिरिक्त कुणाकडेही त्याचा एक्सेस नसेल. याशिवाय जितक्या डिव्हाइसमध्ये व्हाॅट्सअॅप अकाउंट ओपन होईल तितक्या डिव्हाइसमध्ये मेसेजेस आणि चॅट आपोआप सिंक होतील. 

एकंदरच या सेकंडरी डिव्हाइसवर डेस्कटॉप वर्जनवर मिळणारे सर्व फिचर्स युजर्सला मिळतील. तर स्टेटस ठेवण किंवा ब्रॉडकास्ट लिस्टवा मॅनेच करण्याची सोय ही केवळ प्रायमरी व्हाॅट्सअॅपवरच उपलब्ध असेल. 

हे देखिल वाचा-

एका वृत्तानुसार या वर्षी व्हाॅट्सअॅप मेसेज एटिट करण्याचं नवं फिचर लॉन्च करण्याची शक्यता आहे. यामुळे एखादा सेंड करण्यात आलेला मेसेज एडिट करणं शक्य होईल. सध्या मेसेजमध्ये एखादी चूक झाल्यास तो डिलीट करून पुन्हा पाठवावा लागतो.

यासोबतच एखाद्या चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये एखादा मेसेज पीन करण्याचं फिचर येण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रुप चॅटमधील एखादा महत्वाचा मेसेज वर ठेवण्यास मदत होईल. 

एकंदरच येत्या काळात व्हाॅट्सअॅपवर अनेक नवे फिचर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT