ChatGPT Android App eSakal
विज्ञान-तंत्र

ChatGPT Android App : लवरकच येणार चॅटजीपीटीचं अँड्रॉईड अ‍ॅप; जाणून घ्या कसं करता येईल रजिस्ट्रेशन

ChatGPT : बऱ्याच काळापासून यूजर्सना या अँड्रॉईड अ‍ॅपची प्रतीक्षा होती.

Sudesh

चॅटजीपीटी हा एआय चॅटबॉट आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल. आतापर्यंत केवळ कम्प्युटरवर आणि आयफोनवर उपलब्ध असणारं हे एआय टूल आता अँड्रॉईड मोबाईलवरही उपलब्ध होणार आहे.

बऱ्याच काळापासून यूजर्सना या अँड्रॉईड अ‍ॅपची प्रतीक्षा होती. आता गुगलच्या प्ले स्टोअरवर यासाठी रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आलं आहे. प्ले स्टोअरवर या अ‍ॅपचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत, ज्यामुळे याचा इंटरफेस कसा असेल याची झलक आपल्याला दिसू शकते.

ओपन एआयने आतापर्यंत हे स्पष्ट केलेलं नाही की हे अ‍ॅप कोणत्या देशामध्ये सर्वात आधी लाँच होईल. एकाच वेळी अनेक देशांमध्ये हे अ‍ॅप लाँच केले जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात चॅटजीपीटी हा चॅटबॉट लाँच करण्यात आला होता. अवघ्या पाच दिवसांमध्ये या एआय टूलचे १ मिलियन यूजर्स पूर्ण झाले होते.

असं करा रजिस्टर

साधारणपणे पुढच्या आठवड्यात हे अ‍ॅप लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या प्ले स्टोअरवर तुम्ही याचं प्री-रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअरवर जाऊन ChatGPT सर्च करायचं आहे. त्यानंतर ओपन एआयचं चॅट जीपीटी अ‍ॅप सिलेक्ट करून, त्याठिकाणी असणाऱ्या इन्स्टॉल बटणावर क्लिक करायचं आहे. हे बटण निळ्या रंगामध्ये दिसेल, तसंच त्याच्या बाजूला घड्याळाचं चिन्ह असेल.

यानंतर तुम्हाला एक सूचना मिळेल, ज्यात असं सांगण्यात येईल की हे अ‍ॅप अव्हेलेबल झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप इन्स्टॉल होईल. यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT