चॅट जिपीटी लवकरच एक नवीन फिचर लाँच करणार आहे.  esakal
विज्ञान-तंत्र

Technology 2024 : Chat GPT आणतय नवीन फिचर ; आता तुमच्या फाईलचे विश्लेषण होणार चुटकीसरशी

सकाळ वृत्तसेवा

Chat GPT : जगातील सर्वात लोकप्रिय चॅटबॉटमध्ये चॅट जीपीटीची (Chat GPT) गणना होते. चॅट जीपीटी आणखी स्मार्ट बनणार आहे. चॅट जीपीटी डेव्हलपर लवकरच एक नवीन फीचर घेऊन येत आहेत. "कॉन्टेक्सट कनेक्टर" (Context Coonector) नावाच्या या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या गूगल ड्राइव्ह आणि वनड्राईव्ह वरील फाईल थेट चॅटबॉटला विश्लेषणासाठी देऊ शकणार आहात.

ओपनएआय सतत नवीन फीचर्स जोडत असल्याने तो दिवसेंदिवस अधिकाधिक चांगला होत आहे. गेल्या वर्षी, चॅट जीपीटीने अनेक फायली अपलोड करून त्यांचे विश्लेषण करण्याची, माहिती गोळवण्याची आणि सारांश तयार करण्याची सुविधा दिली होती.

आता @legit_rumors नावाच्या अकाउंटने केलेल्या पोस्टनुसार, ओपनएआय (Open AI) "कॉन्टेक्सट कनेक्टर" नावाच्या नवीन फीचरवर काम करत असल्याचे दिसून येते. या फीचरच्या मदतीने चॅट जीपीटी थेट गूगल ड्राइव्ह आणि वनड्राईव्ह वरील फायलींचे विश्लेषण करू शकेल.

आत्तापर्यंत, तुम्हाला चॅट जीपीटीला या क्लाउड सेवांमधून फायली विश्लेषणासाठी द्यायच्या असतील तर, त्या फायली तुमच्या सिस्टिमवर डाउनलोड करून मग चॅटबॉटला द्याव्या लागतात. पण येणारे हे फीचर या संपूर्ण प्रक्रियेला सोपे करेल आणि वेळही वाचेल.

वापरकर्त्यांनी टेन्ट बॉक्सच्या डाव्या बाजूला असलेल्या फाइल अॅटॅचमेंटच्या बटणवर क्लिक केल्यावर चॅट जीपीटी "Add from Google Drive" असा बटन दाखवेल, ज्यावर क्लिक केल्यावर तुमच्या गूगलच्या क्लाउड स्टोरेजमधील सर्व फायली दिसतील. फाइल विश्लेषणासारखेच (Analysis) तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंटचा सारांश, बुलेट पॉईंट्स आणि इतर अनेक कार्ये चॅट जीपीटीकडून करवून घेऊ शकता.

"कॉन्टेक्सट कनेक्टर"(Context Connector) सध्या विकासाच्या अवस्थेत आहे आणि हे फीचर सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल याबाबत कोणतीही माहिती नाही. इतकेच नव्हे, ओपनएआय हे सर्वांसाठी उपलब्ध करेल की फक्त चॅट जीपीटी प्लस सबस्क्रिप्शन (Chat GPT Plus Subscription) घेतलेल्या वापरकर्त्यांपुरतेच मर्यादित ठेवेल याबाबतही अद्याप माहिती नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT