Sam Altman on GPT-4 eSakal
विज्ञान-तंत्र

Sam Altman : 'GPT-4 हे सगळ्यात मूर्ख एआय मॉडेल'; चॅटजीपीटी बनवणाऱ्या सॅम अल्टमननेच केली टीका.. काय आहे कारण?

AGI : अल्टमन यांनी यावेळी आर्टिफिशिअल जनरेटिव्ह इंटेलिजन्सबाबत आपलं मत सांगितलं. यासाठी कितीही पैसा खर्च करण्यासाठी आपण तयार आहे असं ते म्हणाले.

Sudesh

Sam Altman on GPT-4 : ओपन एआय कंपनीने बनवलेल्या चॅटजीपीटी या एआय मॉडेलनंतर जणू संपूर्ण जगात एआय क्रांतीची सुरुवात झाली. यामुळेच कंपनीचे संस्थापक-सीईओ सॅम अल्टमन हेदेखील जगभरात लोकप्रिय झाले. मात्र सॅम यांनी आता चॅटजीपीटीचं पुढचं व्हर्जन असणाऱ्या जीपीटी-4 या मॉडेलची थट्टा केली आहे.

"GPT-4 हे तुम्ही वापरलेलं सर्वात मूर्ख एआय मॉडेल ठरेल" असं ते म्हटले आहेत. सॅम यांच्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की जीपीटी-4 हे एआय मॉडेल चांगलं नाही. सध्याच्या घडीला ते नक्कीच टॉप एआय मॉडेल्सपैकी एक आहे. मात्र भविष्यातील चॅटबॉट्सच्या समोर हे मॉडेल अगदीच बाळबोध वाटेल असे संकेत त्यांनी यातून दिले. (GPT-4 Dumbest AI Model)

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात सॅम उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी जनरेटिव्ह एआय आणि चॅटबॉट्सचं भविष्य, त्यासाठी होणारा खर्च आणि आर्टिफिशिअल जनरल इंटेलिजन्स (AGI) या गोष्टींबद्दल चर्चा केली. यावेळी त्यांनी GPT-4 बाबत केलेल्या वक्तव्यावरुन लक्षात येतंय की या क्षेत्रामध्ये किती वेगाने प्रगती होणार आहे.

कसं असेल GPT-5?

यावेळी बोलताना सॅम यांनी चॅटजीपीटीच्या पुढच्या मॉडेल्सबद्दल देखील चर्चा केली. GPT-5 किंवा त्याचं जे काही नाव असेल, ते मॉडेल अधिक स्मार्ट असणार आहे. तसंच GPT-6 हे त्याहून स्मार्ट असेल. हे सर्व येत्या काही महिन्यांमध्ये किंवा त्याहून वेगाने होऊ शकेल असं सॅम म्हणाले.

कितीही खर्च करायला तयार

अल्टमन यांनी यावेळी आर्टिफिशिअल जनरेटिव्ह इंटेलिजन्सबाबत (Sam Altman on AGI) आपलं मत सांगितलं. ते म्हणाले की यावर सर्वांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. यासाठी कितीही पैसा खर्च करण्यासाठी आपण तयार आहे. मग वर्षाला 5 किंवा 50 बिलियन डॉलर्स देखील खर्च करावे लागले तरी चालेल; असं सॅमने म्हटलं. एजीआय तयार करणं हे खर्चिक असणारच आहे, मात्र समाजाच्या भल्यासाठी आणि भविष्यासाठी हा खर्च गरजेचा असल्याचं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT