सप्टेंबरमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये ओला इलेक्ट्रिक नंबर 1 वर होती. ऑगस्टमध्ये 3,435 युनिट्सच्या विक्रीसह कंपनी 6 व्या क्रमांकावर होती, परंतु सप्टेंबरमध्ये 9,616 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करून नंबर 1 बनली. फेस्टिव्हल ऑफरमुळे कंपनी आपल्या ई-स्कूटरवर 10 हजार रुपयांची सूट देत आहे.
दरम्यान ओला कंपनी आता बाजारात नवा धमाका करण्याच्या तयारीत आहे. वास्तविक, ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले आहे की, 22 ऑक्टोबर रोजी ओला एक मोठी घोषणा करणार आहे. हे कंपनीचे नवीन उत्पादन असेल. दरम्यान असे मानले जात आहे की ओला एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करू शकते. त्याची किंमत सुमारे 80 हजार रुपये असेल.
भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर पोस्ट केले की आमचा दिवाळी कार्यक्रम 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. Ola कडून आजपर्यंतची सर्वात मोठ्या घोषणांपैकी एक घोषणा यावेळी करण्यात येईल. लवकरच भेटू. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरला Ola S1 प्रमाणेच फीचर्स मिळतील, पण त्यात छोटा बॅटरी पॅक मिळेल. सध्या, Ola S1 ची सुरुवातीची किंमत 99,999 रुपये आहे आणि Ola S1 Pro ची किंमत 1,39,999 रुपये आहे.
ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता .यासाठी तुम्हाला olaelectric.com वर जावे लागेल. येथे तुम्हाला Purchase Now चा पर्याय दिसेल. तुम्ही येथे क्लिक करून ते बुक करू शकाल. आता Ola S1 स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपये आहे आणि Ola S1 Pro ची एक्स-शोरूम किंमत 1.30 लाख रुपये आहे. त्याया स्कूटरवर दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सबसिडी देखील उपलब्ध आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स
3 सेकंदात 0 ते 40 किमी पर्यंतचा वेग: Ola ने S1 स्कूटरमध्ये 8.5 kW पीक पॉवर जनरेट करणारी मोटर बसवली आहे. ही मोटर 3.9 kW क्षमतेच्या बॅटरीला जोडलेली आहे. त्यामुळे हे स्कूटर 0 ते 40 किमीचा वेग केवळ 3 सेकंदात पकडते. त्याचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे. हे एका चार्जवर 181 किमी पर्यंतची रेंज देते. यात नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर मोड दिले आहेत.
स्कूटरसह, कंपनी 750-वॅट पोर्टेबल चार्जर देईल. याच्या मदतीने सहा तासांत बॅटरी पूर्ण चार्ज होईल. त्याच वेळी, ओलाचे हायपरचार्जर स्टेशन 18 मिनिटांत 50% बॅटरी चार्ज करू शकते.
स्कूटरमध्ये रिव्हर्स मोडही उपलब्ध असेल. त्याच्या मदतीने, कार पार्किंगमध्ये ठेवणे सोपे होईल. स्कूटर एखाद्या चढाईच्या ठिकाणी थांबवायची असल्यास, मोटर ती जागी धरून ठेवते. म्हणजेच, रायडरला वेग वाढवण्याची किंवा ती सांभाळून पकडण्याची आवश्यकता नाही. याला क्रूझ कंट्रोल मिळेल, ज्यामुळे स्कूटर समान वेगाने धावू शकेल. त्याच्या पुढील आणि मागील दोन्ही भागांमध्ये डिस्क ब्रेक उपलब्ध असतील. समोर मोनोशॉकर्स असतील.
ओलाने या स्कूटरमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे, जो मूव्ह ऑपरेटिंग सिस्टमसह येतो. डिस्प्ले एकदम शार्प आणि ब्राइट आहे. तसेच तो पाणी आणि धूळरोधक आहे. यात ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमसह चिपसेट आहे.हे 4G, वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते.
कंपनी स्कूटरला चाव्या देत नाही. हे स्मार्टफोन अॅप आणि स्क्रीनच्या मदतीने तुम्ही ते लॉक-अनलॉक करू शकाल. यामध्ये सेन्सर्स देण्यात आले आहेत, जेणेकरून स्कूटरजवळ येताच स्कूटर नावाने हाय म्हणेल आणि दूर गेल्यावर तुमच्या नावाने बाय देखील करेल. त्याच्या डिस्प्लेमध्ये जे स्पीडोमीटर दिसेल, त्याला अनेक प्रकारचे फेसेस देखील मिळतील.उदाहरणार्थ, तुम्ही डिजिटल मीटर, जुन्या कारसारखे मीटर किंवा दुसरे फॉरमॅट निवडता येईल. विशेष बाब म्हणजे तुम्ही मीटर निवडताच स्कूटरमधून त्याच प्रकारचा आवाज येईल.
वापरकर्ता त्याच्या स्वत: च्या आवडीनुसार डॅशबोर्ड कस्टमाइज करु शकाल. यामध्ये तुम्ही नेव्हिगेशन, स्पीडोमीटर, म्युझिक अशा विविध गोष्टी कस्टमाइझ करू शकाल.तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांनुसार स्कूटरची गती मर्यादा सेट करू शकता. तसेच हे व्हॉइस कमांडद्वारे नियंत्रित केले जाईल. यासाठी युजरला हाय ओला म्हणत कमांड द्यावी लागेल.उदाहरणार्थ, हाय ओला प्ले सम म्युझिक कमांड दिल्यावर, गाणे प्ले केले जाईल.आवाज वाढवण्याची कमांड दिल्यावर, आवाज वाढेल. यात संगीतासाठी इनबिल्ट स्पीकर दिले आहे. जर कोणी राइड करत असताना कॉल आला, तर तुम्ही स्क्रीनवर टॅप करून तो घेऊ शकाल. यासाठी फोन काढण्याची गरज नाही. हे काम तुम्ही व्हॉईस कमांडद्वारे देखील करू शकाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.