Cheapest Cars Under 6 Lakh Sakal
विज्ञान-तंत्र

Cheapest Cars Under 6 Lakh : सामान्य माणसाच्या खिशाला परवडतील अशा 6 लाखांच्या आतल्या गाड्या

सकाळ डिजिटल टीम

इंडियन मार्केट मध्ये आज गाड्यांची कोणतीच कमतरता नाहीये. म्हणजे एकसौ-एक गाड्या तुमच्या दिमतीला उभ्या आहेत. पण आपला खिसा? आपल्या खिशाला या गाड्या परवडणार का? असा विचार सामान्य माणसं करताना दिसतात.

आज आम्ही तुम्हाला अशा काही गाड्या सांगणार आहोत, ज्यांची किंमत 6 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या या कारबद्दल सविस्तर माहिती.

Maruti Suzuki Swift

मारुती सुझुकी स्विफ्टची किंमत ५.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये तुम्हाला एकूण ४ व्हेरियंट मिळतील. या वाहनात डीआरएल सोबत ऑपरेटर सीट, क्रूझ कंट्रोल, एअर कंडीशनर आणि एलईडी हेडलाइट्स मिळते. डबल फ्रंट एअरबॅग्स, ईबीडी सोबत एबीएस, हील होल्ड कमांड सोबत इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि रियर पार्किंग मिळते.

Tata Tiago

भारतीय बाजारात टाटाची सर्वात जास्त कारची विक्री होणाऱ्या कार पैकी एक आहे. या कारची किंमत ५.६० लाख रुपयापासून सुरू होते. ही १.२ लीटर सोबत येते. या कारमध्ये तुम्हाला ७ इंच टचस्क्रीन मल्टीमीडिया स्क्रीनचा समावेश आहे. जी Apple Car Play आणि Android Auto दोन्ही सोबत येते. ८ स्पीकर ऑडियो सिस्टम, टेम्परेचर कंट्रोल सारखे फीचर्स मिळतात.

Tata Punch

टाटा पंच एक मिनी एसयूव्ही आहे. या कारची किंमत ६ लाख रुपये आहे. यात डिजिटल डिस्प्ले पॅनेल, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, लिंक्ड वाहन, ७ इंचाची टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स मिळतील. यात ट्विन फ्रंट एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन सोबत एक एबीएस, एक रियर डिफॉगर, रियर पार्किंग इंडिकेटर्स, एक रियर व्ह्यू कॅमेरा आणि सेफ्टी फीचर्स मिळतील.

Hyundai Grand i10 Nios

भारतीय बाजारात या कारची किंमत ५.७३ लाख रुपये आहे. या कारमध्ये तुम्हाला १.२ लीटरचे पेट्रोल इंजिन मिळते. जी ११३.८ एनएमचे टॉर्क आणइि ८३ हॉर्स पॉवर जनरेट करते. ही कार ६ एअरबॅग, हिल होल्ड असिस्टेंट, हेडलाइट आणि ईएससी सारखे फीचर्स मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT