Ram Mandir Cyber Attack eSakal
विज्ञान-तंत्र

Ram Mandir : चीन अन् पाकिस्तानातून झाले राम मंदिराची वेबसाईट हॅक करण्याचे प्रयत्न; भारताच्या सायबर फोर्सने दिलं जोरदार प्रत्युत्तर

Ram Mandir Website Hack : मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराचं उद्घाटन होत असताना मंदिराच्या वेबसाईटवर सातत्याने सायबर हल्ले होत होते.

Sudesh

Ayodhya Ram Mandir Website attacked by Hackers : अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्राण प्रतिष्ठा यावर्षी 22 जानेवारी रोजी करण्यात आली होती. संपूर्ण देश या दिवशी रामलल्लाच्या स्वागताच्या तयारीत होता, तर दुसरीकडे देशातील सायबर सुरक्षा एजन्सीचे अधिकारी मात्र डोळ्यात तेल घालून भारतीय वेबसाईट्सचं रक्षण करत होते. याला कारण म्हणजे, या दिवशी चीन आणि पाकिस्तानमधून भारतातील वेबसाईट्सवर सगळ्यात जास्त सायबर हल्ले करण्यात आले होते.

चीन-पाकिस्तानसह इतर काही देशांमधून देखील भारतावर सायबर हल्ले केले जात होते. या हल्ल्यांच्या माध्यमातून हॅकर्स राम मंदिराची वेबसाईट (Ram Mandir Website) हॅक करण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती समोर आली आहे. हे होणार याची सरकारला आधीच चुणूक होती. त्यामुळे यासाठी आधीच एक सुरक्षा टीम तयार करण्यात आली होती. सायबर हल्ल्यांना रोखण्यासाठी स्वदेशी एआय आणि मशीन लर्निंगच्या टेक्निकचा वापर करण्यात आला.

मंदिराच्या उद्घाटनावेळी सर्वाधिक हल्ले

मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराचं उद्घाटन होत असताना मंदिराच्या वेबसाईटवर सातत्याने सायबर हल्ले (Cyber Attacks) होत होते. यासोबतच, प्रसार भारती आणि यूपीमधील इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित इतर वेबसाईट्स देखील बंद करण्याचा प्रयत्न हॅकर्स करत होते. यामध्ये चीन आणि पाकिस्तानमधील हॅकर्सचा (Pakistani Hackers) सर्वाधिक समावेश होता. जागरणने याबाबतचं वृत्त प्रसिद्द केलं आहे.

असे थांबवले हल्ले

सायबर हल्ल्यांना थांबवण्यासाठी टेलिकॉम सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची (TSOC) स्थापना करण्यात आली होती. राम मंदिर, प्रसार भारती, यूपी पोलीस, एअरपोर्ट, यूपी पर्यटन आणि पॉवर ग्रिड यासोबत सुमारे 264 वेबसाईट्सवर हे सेंटर लक्ष ठेऊन होते. (Ram Mandir Website Cyber Attack)

जानेवारी महिन्यात 24x7 या वेबसाईट्सवर लक्ष ठेवलं जात होतं. सुमारे 140 आयपी अ‍ॅड्रेसवरुन या वेबसाईट्सवर हल्ले केले जात होते. धोकादायक आयपी अ‍ॅड्रेसची माहिती मिळताच त्वरीत त्याबाबत इंटरनेट प्रोव्हाईडर्सना सूचना देऊन त्यांचा इंटरनेट अ‍ॅक्सेस बंद करण्यात येत होता. अशा प्रकारे सरकारने 21-22 जानेवारी दरम्यान तब्बल 1,244 आयपी अ‍ॅड्रेस ब्लॉक केले. यानंतर हल्ल्यांची संख्या कमी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT