common passwords can easily hack esakal
विज्ञान-तंत्र

Common Password Hack : अलर्ट! तुमचे हे कॉमन पासवर्ड काही सेकंदात होऊ शकतात हॅक; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Strong Password Tips : काही कॉमन पासवर्ड एका सेकंदात हॅक करता येण्यासारखे असल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक डेटा मोठ्या धोक्यात आहे.

Saisimran Ghashi

Strong Password : सध्याच्या डिजिटल युगात सुरक्षित पासवर्ड असणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. मात्र, नॉर्डपासच्या संशोधनानुसार, जगभरातील आणि भारतातील अनेक वापरकर्ते अजूनही ‘123456’, ‘password’, ‘123456789’ यांसारखे सोपे पासवर्ड वापरत आहेत. हे पासवर्ड एका सेकंदात हॅक करता येण्यासारखे असल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक डेटा मोठ्या धोक्यात आहे.

भारतीय वापरकर्त्यांचे सोपे पासवर्ड्स

भारतामध्ये, अनेक वापरकर्ते ‘Indya123’, ‘Abcd1234’, ‘Admin’ यांसारखे सोपे व सहज लक्षात राहणारे पासवर्ड वापरतात. हे पासवर्ड सोपे असल्यामुळे ते हॅकर्ससाठी खुल्या आमंत्रणासारखेच आहेत. विशेषतः, ‘password’ हा पासवर्ड भारतात दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक वापरला जातो. ही समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नसून, यूके आणि ऑस्ट्रेलियामध्येही याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.

कॉर्पोरेट अकाउंट्सवर वाढता धोका

संशोधनाने असेही उघड केले की व्यावसायिक खात्यांमध्येही सुरक्षेची मोठी तफावत आहे. अनेक कर्मचारी ‘admin’ किंवा ‘newmember’ यांसारखे डिफॉल्ट पासवर्ड वापरतात. याशिवाय, कर्मचारी वैयक्तिक आणि व्यावसायिक खात्यांसाठी तेच पासवर्ड पुन्हा वापरतात, ज्यामुळे दोन्ही प्रकारचे खाते सायबर हल्ल्यांसाठी असुरक्षित ठरतात.

सायबर सुरक्षेचे वाढते संकट

संशोधनानुसार, जगातील 78% पासवर्ड एका सेकंदात क्रॅक करता येतात. हा आकडा गेल्या वर्षीच्या 70% च्या तुलनेत वाढलेला आहे. सायबर तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की साध्या पासवर्ड्समुळे हॅकर्सना सहज प्रवेश मिळतो, ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती व आर्थिक खाते धोक्यात येते.

डिजिटल सुरक्षेसाठी उपाययोजना

1. अवघड आणि मोठा पासवर्ड तयार करा: कमीत कमी 20 अक्षरे असलेले आणि अंक, अक्षरे व विशेष चिन्हांचा समावेश असलेले पासवर्ड वापरा.

2. वेगळे पासवर्ड वापरा: प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र पासवर्ड तयार करा.

3. मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा: अतिरिक्त सुरक्षेसाठी हे टुल वापरा.

4. पासवर्ड मॅनेजरचा वापर: कठीण सवर्ड लक्षात ठेवण्यासाठी हे साधन उपयुक्त ठरते.

सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे आणि व्यावसायिक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी आजच तुमचे पासवर्ड बदला. सोप्या पासवर्डचा वापर टाळा आणि तुमची डिजिटल सुरक्षा भक्कम करा. सायबर गुन्हेगारांना संधी देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : खडकवासला जवळील डोणजे गावचे माजी उपसरपंचाची हत्या

SCROLL FOR NEXT