Normal LED Vs Smart LED : घरात वापरले जाणारे LED बल्ब खूप महत्वाचे असतात. अनेकदा याच लाइटच्या चुकीच्या वापराने आपल्याला डोळ्यांचा त्रास (Eye Care), डोक्याचा त्रास (Headache) असे अनेक त्रास सुरु होतात.
शिवाय घरातल्या लाइट्समुळेही आपली त्वचा टॅन (Skin Care) होते त्यामुळे घरातले लाइट्स निवडतांना खूप काळजी घेणं गरजेचं आहे.
घरात लहान मुलं (house lighting for kids), म्हातारी माणसं (house lighting as per old people)सगळेच असतात आणि त्यांच्या जीवाशी आपण खेळू शकत नाही.
शिवाय अनेकांना रात्री उशिरापर्यंत काम करण्याची, पुस्तक वाचण्याची (best lamp for reading) किंवा सिरिज बघण्याची सवय असते अशात स्वतःच्या तब्बेतीची (health care) विशेषतः डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेच आहे.
बाजारात LED बल्बचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये साधे LEd बल्ब आहेत, त्याचप्रमाणे आता स्मार्ट LED बल्बही बाजारात आले आहेत, जे दिवसेंदिवस लोकांची पसंती बनता आहेत.
अर्थात असं असलं तरी आजही लोक त्यांच्या घरात फक्त साधे LED बल्ब वापरतात, पण या दोन्ही बल्ब मधला फरक तुम्हाला माहिती आहे का?
संभ्रमात पडून चुकीचे निर्णय घेऊ नका. चला जाणून घेऊया या दोन्ही बल्ब मध्ये नक्की फरक काय आहे? यामुळे तुमच्यासाठी ते विकत घेणे आणि ते तुमच्या घरात वापरणे सोपे होईल शिवाय तुमच्या घराच्या गरजेनुसार कोणता बल्ब पर्याय सर्वोत्तम आहे हे तुम्हाला समजेल.
नॉर्मल LED बल्ब (Normal LED Bulb)
साध्या किंवा नॉर्मल LED बल्बबद्दल बोलायचे झाले तर त्यात फक्त पांढरा प्रकाश असतो. याने घरातले ईलेक्ट्रीसिटी कमी वापरली जाते परिणामी वीजेचे बिल सुद्धा कमी येईल. इतकच नाही तर वाचन किंवा महत्त्वाचे काम करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
साध्या किंवा नॉर्मल LED बल्बची किंमत ₹50 पासून सुरु होते आणि ₹200 पर्यंत जाते. जरी त्यांच्या किंमती आकारानुसार निर्धारित केल्या जातात, पण तरी त्यांची खरेदी करणे खूप किफायतशीर आहे.
शिवाय साधे LED बल्ब आकाराने लहान असले तरी ते खूप शक्तिशाली असतात आणि हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो. अगदी ते घरात रात्री नाइट लॅम्प म्हणून सुद्धा हे बल्ब खूप मदत करतील.
स्मार्ट एलईडी बल्ब (Smart LED Bulb)
आपण स्मार्ट TV स्मार्ट फोन बद्दल ऐकलं आहे पण हे स्मार्ट LED म्हणजे नक्की काय आहे? बाजारात सतत काहीना काही नवीन टेक्नॉलजी येत असतात. अशातच हे स्मार्ट LED सगळ्यांचेच लक्ष वेधून घेता आहेत.
हे स्मार्ट LED आपल्या स्मार्टफोनला कनेक्ट करता येतात आणि त्याने ऑपरेट सुद्धा करता येतात. आपल्याला हवे असलेले लाइट्स सुद्धा यात उपलब्ध आहेत. म्हणजेच आपण त्याच्यातले रंग बदलू शकतो.
स्मार्ट LED बल्ब हे साध्या LED बल्बपेक्षा आकाराने थोडे मोठे असतात. जर आपण किंमतीबद्दल बोललो, तर सामान्य एलईडी बल्बच्या तुलनेत त्यांची किंमत थोडी जास्त आहे. तुम्हाला अनेक प्रकारच्या आकारांमध्ये स्मार्ट एलईडी बल्ब मिळतात आणि तुम्ही त्यांना तुमच्या आवडत्या आकारात निवडू शकता.
स्मार्ट एलईडी बल्बचा प्रकाश सामान्य एलईडी बल्बपेक्षा कमी असतो. स्मार्ट एलईडी बल्बचा प्रकाश आणि रंग बदलला जाऊ शकतो. त्यांची सुरुवातीची किंमत 300 पासून सुरु होते आणि ₹500 किंवा ₹1000 पर्यंत जाते.
असे बल्ब पार्टीसाठी किंवा सभोवतालच्या प्रकाशासाठी वापरले जातात. काहीवेळा स्मार्ट LED बल्ब स्पीकरसह येतात, अशावेळी ते जास्त वीज वापरतात. ते थोड्याच वेळात खराब होऊ शकतात कारण एकाच बल्ब मध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत.
हे बल्ब कितीही आकर्षक असले तरी यात कॉन्सट्रेशन फोकस नसून स्प्रेड फोकस आहे त्यामुळे रात्री अभ्यासासाठी, काम करण्यासाठी किंवा पुस्तक वाचण्यासाठी हे तितकेसे फायदेशीर नाही आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.