जर तुम्ही लॅपटॉप किंवा संगणक हँग होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची या समस्येपासून सुटका होऊ शकते. ही युक्ती वापरून तुमच्या संगणकाला किंवा लॅपटॉपला हँग होण्याची समस्या येणार नाही.
आपल्या स्मार्टफोनचा स्पीड कसा वाढवायचा याबाबत आपण जागरूक असतो मात्र संगणकाच्या बाबतीत आपण फारसं लक्ष देत नाही. त्यामुळे आपला संगणक किंवा लॅपटॉप खूपच स्लो होतो. बहुधा संगणक हा आपण कामासाठी वापरतो, त्यामुळे संगणक जर स्लो झाला तर साहजिकच आपलं कामही स्लो होतं . यासाठीच संगणकाचा स्पीड चांगला असणं महत्त्वाचं आहे. आजकाल संगणकांमध्ये ही सामान्य समस्या बनली आहे. लॅपटॉप आणि संगणकाच्या खराब स्पीडमुळे अनेकांना त्रास होतो. कधीकधी ही समस्या इतकी वाढते की संपूर्ण सिस्टीम पूर्णपणे हँग होते.
या समस्येचा सामना करण्यासाठी आपल्याला संगणक बंद करावा लागतो. कधीकधी सिस्टम रिबूट करावी लागते. यामुळे सिस्टीम हँगची समस्या सुटते, पण कधी कधी आपण केलेलं कामही डिलीट होतं. अशा परिस्थितीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सिस्टीम हँग होण्याची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. यामुळे लोकांचा वेळ तर वाया जातोच शिवाय केलेलं काम वाया जाण्याचीही भीती असते.
जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल, तर आज आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची या समस्येपासून सुटका होऊ शकते. ही युक्ती वापरून, तुमच्या संगणकाला किंवा लॅपटॉपला हँग होण्याची समस्या येणार नाही. चला जाणून घेऊया काय आहे ही युक्ती.
ही युक्ती अवश्य अवलंबावी-
एक लक्षात घ्यायला हवं की, कोणताही संगणक किंवा लॅपटॉप हँग होतो जेव्हा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंक फाइल्स साठलेल्या असतात. अशा परिस्थितीत त्यांना हटवणे खूप महत्वाचे आहे. त्याच्या सोप्या स्टेप्स-
- प्रथम तुम्हाला तुमच्या PC वर कमांड प्रॉम्प्ट उघडावे लागेल.
- यासाठी तुम्हाला विंडोच्या खालच्या बाजूला कमांड प्रॉम्प्ट टाइप करून सर्च करावे लागेल.
- त्यानंतर एक विंडो उघडेल, ही तात्पुरती विंडो आहे.
- जंक फाइल डिलीट करण्यासाठी येथे एक कोड टाकावा लागेल. हा कोड आहे, %SystemRoot%\explorer.exe %temp%\
- हा कोड टाकून ENTER बटन दाबताच तुमच्या समोर एक विंडो उघडेल ज्यामध्ये सर्व जंक फाइल्स असतील.
- यानंतर तुम्हाला Ctrl A. याच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी सर्व फाईल्स डिलीट करू शकाल.
- तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही Delete key किंवा shift + Delete देखील करू शकता. त्यामुळे या फाईल्स रिसायकलिंग बिनमध्येही जाणार नाहीत.
- आता तुम्हाला Del %temp%\. /s/q कमांड वापरावी लागेल.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमच्या सिस्टममधील सर्व जंक फाइल्स हटवल्या जातील.
- असे केल्याने तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स जशा आहेत तशाच राहतील.
- जंक फाइल्स हटवून डिस्क स्पेस देखील मोकळी केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला लोडीस्क कमांड वापरावी लागेल. ही कमांड cleanmgr /lowdisk /e आहे.
- या प्रक्रियेनंतर, लॅपटॉप किंवा संगणकावरून निरुपयोगी फायल्स हटविल्या जातील.
- या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुमचा पीसी किंवा लॅपटॉप पूर्णपणे सुपरफास्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.