Parenting Tips eSakal
विज्ञान-तंत्र

Parenting Tips : सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पाहा! एआयच्या मदतीने कसा होतो गैरवापर?

कित्येक पालकांनी तर आपल्या लहान मुलांच्या नावाने इन्स्टाग्राम पेजेसही सुरू केले आहेत.

Sudesh

सध्या कित्येक लोक सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. आपल्या आयुष्यात काय सुरू आहे, हे फोटोंच्या माध्यमातून वारंवार शेअर करत राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे, जनरेशन झी आणि मिलेनियल्समध्ये हे प्रमाण सर्वात जास्त दिसून येतं.

८० आणि ९० च्या दशकातील कित्येकांना आता मुलं झाली आहेत. सोशल मीडियावर आपल्या मुला-मुलींचे किंवा नात्यातील लहानग्यांचे फोटो कित्येक जण पोस्ट करत असतात. कित्येक पालकांनी तर आपल्या लहान मुलांच्या नावाने इन्स्टाग्राम पेजेसही सुरू केले आहेत. मात्र, हे करताना एका मोठ्या धोक्याकडे ते दुर्लक्ष करतात.

एआयचा गैरवापर

अरुण बोथ्रा नावाच्या एका ट्विटर यूजरने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये सोशल मीडियावरील लहान मुलांच्या फोटो आणि व्हिडिओंचा कशा प्रकारे गैरवापर केला जातो, याबाबत माहिती देण्यात आली आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत १६ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर सहा हजारांहून अधिक वेळा याला रिट्विट करण्यात आलं आहे. "तुमच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पाहा. तुमची मुलं भविष्यात तुमचे आभार मानतील" असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय.

सोशल मीडियावर सातत्याने आपल्या मुलांचे फोटो टाकणाऱ्या पालकांचे डोळे उघडणारा हा व्हिडिओ असल्याचं मत नेटिझन्स व्यक्त करत आहेत. एआय म्हणजेच, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे कित्येक फायदे आहेत. मात्र, ही एक दुधारी तलवार आहे. त्यामुळे, वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी याचा गैरवापर केल्यास त्याचा धोकाही तेवढाच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेतच लढाई; ठाकरेंच टेंशन वाढणार?

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : इम्तियाज जलील म्हणजे फडणवीसांचे हस्तक!

Latest Maharashtra News Updates Live : के पी पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Zomato: सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका! झोमॅटोने वाढवली 60 टक्के प्लॅटफॉर्म फी, कंपनीने सांगितले कारण

Solapur Assembly Election 2024 : सोलापूरात काँग्रेसच्या वाट्याला तीन मतदारसंघ? सर्वांचे लक्ष सोलापूर दक्षिण, मध्यवर...

SCROLL FOR NEXT