use Induction Cooktop without utelsits Esakal
विज्ञान-तंत्र

Induction साठी वेगळी भांडी कशाला, ही ट्रीक वापरून कोणत्याही पातेल्यात इंडक्शनवर करा स्वयंपाक

अनेकजण घरात गॅसस्टोव्ह सोबत इंडक्शनचा Induction वापर अधिक करू लागले आहेत. स्वयंपाकासाठी गॅसच्या Cooking Gas तुलनेत इंडक्शन शेगडीसाठी कमी ऊर्जा आणि कमी वेळ लागत असल्याने तो एक उत्तम पर्याय आहे

Kirti Wadkar

स्वयंपाक करण्यासाठी किंवा विविध पदार्थ शिजविण्यासाठी घराघरात वापरण्यात येणाऱ्या गॅस स्टोव्हसाठी आता अनेक विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

यात ओव्हन, इलेक्ट्रिक कुकुर, एअर फ्रायर तसचं इंडक्शन शेगडी असे अनेक पर्याय आहेत. Cooking Hacks in Marathi Use Any Utelsits for your Induction Stove in Kitchen

यातही खास करून अनेकजण घरात गॅसस्टोव्ह सोबत इंडक्शनचा Induction वापर अधिक करू लागले आहेत. स्वयंपाकासाठी गॅसच्या Cooking Gas तुलनेत इंडक्शन शेगडीसाठी कमी ऊर्जा आणि कमी वेळ लागत असल्याने तो एक उत्तम पर्याय आहे.

इंडक्शनमुळे वेळेची आणि उर्जेची Energy बचत होत असली तरी इंडक्शन खरेदी करताना एक मोठा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. हा प्रश्न म्हणजे इंडक्शनसाठी वेगळी भांडी Utelsils खरेदी करणं.

इंडक्शन स्टोव्हसाठी खास पसरट बेस असलेली स्टेनलेस स्टीलची Stainless Steel किंवा आयर्न बेस्ड भांडी वापरावी लागतात. नेहमीच्या गॅस शेगडीवर वापरण्यात येणारी पातेली किंवा भांडी इंडक्शनवर वापरणं शक्य नाही. यासीठी वेगळी भांडी खरेदी करणं मोठं खर्चिक असल्याने अनेकजण इंडक्शनकडे पाठ फिरवतात.

इंडक्शनवर स्वयंपाक करण्यासाठी वेगळ्या भांड्यांची गरज असली तरी आता तुम्ही तुमच्या किचनमधील नेहमीच्या वापरातील भांडी देखील इंडक्शनवर स्वयंपाक करण्यासाठी वापरू शकता.

होय काही ट्रीक्स वापरून तुम्ही ही भांडी इडक्शन बेसवर वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या बेसची भांडी खरेदी करण्याची गरज नाही.

हे देखिल वाचा-

कन्व्हर्टर डिस्क- इलेक्ट्रीक इंडक्शन स्टोव खरेदी केल्यानंतर तुम्हाला पातेलं, कढई, पॅन अशी अनेक इंडक्शन फ्रेण्डली भांडी खरेदी करण्याची अजिबात आवश्यकता नाही.

induction converter यासाठी तुम्हाला केवळ एक कन्व्हर्टर डिस्क खरेदी करावी लागेल. या डिस्कच्या मदतीने तुम्ही तुमच्या नेहमीच्या साध्या भांड्यांमध्ये देखील इंडक्शनवर स्वयंपार करू शकता. induction base plate

एखाद्या सपाट तव्याप्रमाणे दिसणारी ही डिस्क मॅग्नेटिक मटेरियलने तयार करण्यात आलेली असते. ही डिस्क इंडक्शनची हिट तुमच्या नेहमीच्या साध्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते. यामुळे भांडं तापून स्वयंपाक करणं करणं शक्य होतं.

तुम्हाला ऑनलाईन ही डिस्क सहज उपलब्ध होईल. मात्र डिक्सचा बेस पूर्णपणे सपाट आहे हे पडताळणं गरजेचं आहे. how to use normal utensils on induction cooker

हे देखिल वाचा-

तारेची जाळी- इंडक्शनवर घरातील कोणतही नॉन इंडक्शन भांडं वापरण्यासाठी तुम्ही स्वस्तात मस्त अशा तारेच्या जाळीचा वापरही करू शकता.

यासाठी तुमच्या इंडक्शनवर असलेल्या मोठ्या गोलाकार वर्तुळाच्या आकाराहून थोडी मोठी जाळी असणं आवश्यक आहे. बाजारातून ही जाळी आणल्यानंतर ती आधी सपाट करा. तुम्ही लाटणं किंवा एखाद्या जड वस्तू खाली ठेवून ही जाळी सपाट करू शकता.

स्वयंपाक करण्यापूर्वी आधी इंडक्शनवर ही जाळी नीट ठेवा. ती पूर्णपणे इंडक्शनच्या बेसवर बसणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यावर तुम्हाला हवं असलेलं नॉन इंडक्शन भांडं ठेवून तुम्ही स्वयंपाक करू शकता.

इंडक्शन पॅन- तुमच्याकडे केवळ एकच इंडक्शन पॅन असेल तरी तुम्ही त्याचा वापर करू शकता. यासाठी आधी इंडक्शनवर पॅन ठेवा. हा पॅन तापल्यानंतर त्यावर तुम्ही किचनमधील इतर नॉन इंडक्शन पातेलं ठेवू शकता. या पर्यायासाठी मात्र स्वयंपाकासाठी थोडा जास्त वेळ लागू शकता.

केवळ पाणी तापवणं, दूध तापवणं, चहा, कॉफी अशा काही साध्या पदार्थांसाठी तुम्ही ही ट्रीक नक्की वापरू शकता. यासाठी तुम्हाला वेगळं इंडक्शन कुकवेअर खरेदी करण्याची गरज नाही.

इंडक्शनसाठी तयार करण्यात आलेली खास भांडी ही बाजारामध्ये नेहमीच्या साध्या भांड्यांच्या किमतीहून महाग असतात.

अनेकदा साध्या भांड्यांच्या किमतीहून दुप्पट किंमत या भांड्यांची असते. मात्र तुम्ही आम्ही सांगितलेल्या या ट्रीक्सच्या मदतीने घरातील रोजची नॉन इंडक्शन भांडी देखील इंडक्शन टॉपसाठी वापरून मोठी बचत करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT