Crayon Motors ने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Envy लाँच केली आहे. कंपनीचे हे दुसरे उत्पादन आहे. यापूर्वी कंपनीने स्नो + इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली होती. Envy ही कंपनीची दुसरी लो-स्पीड, प्रीमियम ई-स्कूटर आहे.
Crayon Motors Envy लो-स्पीड प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर 64,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. यात मोठी बूट स्पेस, कीलेस स्टार्ट आणि रिव्हर्स असिस्ट सारखे फीचर्स दिले आहेत. रिव्हर्स असिस्ट वापरुन तुम्हाला स्कूटरला पुढे-मागे हलवण्यास मदत मिळते आणि पार्किंगच्या वेळी उपयुक्त ठरते.
Crayon Motors Envy मध्ये तुम्हाला पांढरा, काळा, निळा आणि सिल्व्हर असे चार रंग पर्याय मिळतात. कंपनी आपल्या मोटर आणि कंट्रोलरवर 24 महिन्यांची वॉरंटी देत आहे. कंपनी 100 हून अधिक रिटेल स्टोअर्सवर Envy उपलब्ध करून देईल. क्रेयॉन मोटर्स त्याच्या गाझियाबाद उत्पादन युनिटमध्ये स्कूटरचे डिझाइन आणि उत्पादन करते.
महत्वाचे म्हणजे ही स्कूटर चालवण्यासाठी प्रति किलोमीटर फक्त 14 पैसे खर्च येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. जिओ टॅगिंग आणि सेंट्रल लॉकिंग हे सेफ्टी फीचर्स मध्ये यामध्ये देण्यात आले आहेत. याशिवाय यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि मोबाईल चार्जिंग देखील देण्यात आले आहे. Crayon Envy लो-स्पीड स्कूटरची टॉप स्पीड 25 kmph असून हे चालवण्यासाठी राइडरकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशनची गरज नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.