Can You Pay a Bill of Credit Card With another Credit Card esakal
विज्ञान-तंत्र

एका Credit Card वरून दुसऱ्या कार्डचं बिल भरता येतं का?

क्रेडिट कार्ड वापरताना विशेष काळजी घ्यायला लागते

Pooja Karande-Kadam

Credit Card Tips : सध्याच्या घडीला क्रेडिट कार्ड नसणारी व्यक्ती शोधून सापडणार नाही. क्रेडिट कार्डचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. तुमच्याकडे भलेही पैसे नसतील तरीही तुम्ही तुमच्या आवडीची वस्तू पटकन खरेदी करु शकता आणि नंतर पैसे देऊ शकता. म्हणजेच तुमचा शौक पुर्ण करण्यासाठी पैशांची अडचण येत नाही.

काही वेळा असे घडते की क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी डेबिट कार्डमध्ये पैसेच शिल्लक राहत नाहीत. अशा परिस्थितीत एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डवरून भरता येईल का, असा प्रश्न निर्माण होतो. उत्तर आहे होय. या प्रक्रियेला बॅलन्स ट्रान्सफर म्हणतात.

जेव्हा तुमच्याकडे अनेक क्रेडिट कार्ड असतात, परंतु आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही कार्डचे बिल भरता येत नाही. त्यानंतर एका कार्डवरून दुसऱ्या कार्डमध्ये शिल्लक ट्रान्सफर करून बिल पेमेंट केले जाते. अनेक बँका अशा प्रकारची सुविधा देतात. दुसर्‍या बँकेचे एक क्रेडिट कार्ड वापरून क्रेडिट कार्ड बिल भरण्याची परवानगी बॅंकेकडून दिली गेली आहे.

तुम्ही एका क्रेडिट कार्डचे बिल दुसर्‍या क्रेडिट कार्डवरून भरू शकता. ज्यामध्ये कॅश ट्रान्सफर करण्याचा पर्याय आहे. अनेक बँका त्यांच्या काही निवडक क्रेडिट कार्डांवर कॅश ट्रान्सफरची परवानगी देतात. यासाठी इतर कार्डची क्रेडिट लिमिट खर्च केलेल्या रकमेपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

ज्या बँकेच्या कार्डमधून पैसे ट्रान्सफर घेतले जातात. ती बँक तुमच्याकडून प्रोसेसिंग फी आणि जीएसटी घेते. या सुविधेमध्ये, क्रेडिट कार्ड ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी पुन्हा एक बफर कालावधी मिळतो ज्यासाठी तुम्हाला कोणतेही व्याज भरावे लागणार नाही.

आगाऊ रक्कम

तुम्ही तुमचे क्रेडिट कार्डचे बिल पैसे देऊनही भरू शकता. यासाठी तुम्ही कॅश अॅडव्हान्सचा पर्याय अवलंबू शकता. अडचणीच्या प्रसंगी अॅडव्हान्स उपयोगी पडू शकतो. परंतु तुम्हाला त्यावर शुल्क भरावे लागेल. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करून एटीएममधून पैसे काढू शकता.

ई-वॉलेट क्रेडिट कार्ड पेमेंट

क्रेडिट कार्ड बिल पेमेंट ई-वॉलेटद्वारे केले जाऊ शकते. तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे टाकू शकता आणि नंतर ते बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता. त्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरू शकता. ही पद्धत एटीएममधून पैसे काढण्याच्या पूर्वीच्या पद्धतीची डिजिटल आवृत्ती आहे.

कर्ज घेऊ शकता

बॅलन्स ट्रान्सफर मनी घेतल्यानंतर, तुम्ही त्याची परतफेड करण्यासाठी EMI पर्याय निवडू शकता. बिल भरण्यासाठी, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेत असेल तेवढे पैसे बिल भरण्यासाठी वापरू शकता. कार्डची मर्यादा रु. 50,000 आहे, त्यामुळे तुम्ही त्या कार्डमधून रु. 50,000 पेक्षा जास्त शिल्लक ट्रान्सफर करू शकत नाही. तुम्ही EMI निवडल्यास, तुम्हाला व्याज द्यावे लागेल.

कार्ड वापरताना हि काळजी घ्या

  • क्रेडिट कार्ड वर जास्त इंटेरेस्ट द्यावा लागतो

  • क्रेडिट कार्डचा विचारपूर्वक वापर करा

  • टर्म अँड कंडीशनवर असुदे लक्ष

  • सीबिल स्कोअर होईल खराब

  • क्रेडिट कार्ड कर्ज घ्यायला भाग पाडते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT